आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 लाखांच्या फटाक्यांचा अवैध साठा जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एमआयडीसीतील सेक्टर व्ही मधील प्लॉट क्रमांक 17 मधील गोडाऊनवर स्थानिक गुन्हा शाखेने गुरुवारी छापा टाकला. त्यात विविध कंपन्यांच्या फटाक्यांचा दीड टन वजनाचा 20 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. फटाकेविक्रेता आदनान राजकोटवाला यांनी हा साठा करून ठेवला होता.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या भावात होणारी चढ-उतार लक्षात घेऊन विक्रेत्यांनी अवैधरीत्या फटाक्यांचा साठा करून ठेवला होता. ठरावीक क्षमतेपेक्षा जास्त साठा करता येत नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. कंपनीच्या वॉचमनला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.