आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात गौणखनिजाची वाहतूक; चार डंपर पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- गिरणेची रेती घेऊन शहरात प्रवेश करणारे चार डंपर महसूल विभागाने शुक्रवारी सकाळी 11 वाजता पकडले. कागदपत्रे, परवाना आहे अशी बतावणी करत चालकांनी डंपर तहसील कार्यालयात नेण्यास नकार दिला. पोलिसांनी समज देताच डंपर घेऊन ते तहसीलकडे रवाना झाले.

एमएच-19-झेड-0364, एमएच-19-झेड-9091, एमएच-19-झेड-3757 आणि एमएच-19-झेड-4142, एमएच-19-झेड-2686 हे डंपर जळगावकडून गिरणाची रेती भरून भुसावळ शहरात येत होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरून तलाठी एन.आर. ठाकूर यांनी महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयाजवळ डंपर थांबवले. कागदपत्रांची पाहणी केली. मात्र, डंपरचालकांजवळील पावत्यांबद्दल संशय आल्याने त्यांनी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांना माहिती दिली. प्रांतांनी सर्व डंपर तहसील कार्यालयात जमा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, चालकांनी तहसीलपर्यंत डंपर नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रांताधिकारी मुंडके यांनी डीवायएसपी विवेक पानसरे, पोलिस निरीक्षक दिलीप पगारे यांच्याशी चर्चा करून घटनास्थळावर पोलिस पाठविण्याची सूचना केली. यानंतर शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रवींद्र मानकर, कमलाकर बागुल यांच्यासह डीबी पथकातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकांना समज दिली. रेतीने भरलेले डंपर तहसील कार्यालयात आणले. प्रांताधिकार्‍यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकातील बी.वाय. चौधरी, संदीप जैसवाल, डी.बी.पाचपांडे, अन्वर बेग, मंडळाधिकारी ए.के. तायडे, एस.यू.तायडे, पी.पी.चव्हाण, पी.सी.शिंपी, एस.एम.ठाकूर, डी.एन.काकडे हजर होते.