आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्राय डे ला पकडली ९२ हजारांची दारू, पोलिसांची धडक कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डाॅ.आंबेडकर जयंतीमुळे मंगळवारी 'ड्राय डे' होता. मात्र, याच दिवशी मद्यपींनी दारू पिण्याचा मुहूर्त साधला. परिणामी, विक्रेत्यांनीही हवी त्याला दारू मिळवून दिली. या गडबडीत एलसीबी, रामानंदनगर एमआयडीसी पोलिसांनी छापे टाकून ९२ हजार ६०८ रुपयांची दारू पकडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावरील पूजा हॉटेलशेजारी असलेल्या एका टपरीवर छापा टाकला. त्यात देशी-विदेशी मिळून एकूण १९ हजार ८९४ रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तेथे अजय बन्सीलाल सोनवणे हा दारूविक्री करीत होता. त्यानंतर सुप्रीम कॉलनी भागात आझाद बहादूर कंजर, सुनीता कंजर रेणुका कंजर यांच्या घरी छापा टाकण्यात अाला. तेथे १० हजार ४५४ रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच एमआयडीसी पोलिसांनी दुपारी मेहरूण भागातील महादेव मंदिर, कंजरवाडा, जाखनीनगर तांबापुरा येथे छापे टाकण्यात अाले. तेथून एकूण ६२ हजार २६० रुपयांची दारू जप्त करण्यात अाली अाहे. या धडक कारवाईनंतर संशयितांवर रामानंदनगर एमअायडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कंजरवाड्यात खुलेअाम दारूविक्री
अनेकवर्षांपासून 'ड्राय डे'ला दारू मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंजरवाडा परिसरात सकाळपासून खुले अाम दारू विक्री सुरू हाेती. पांडे चौक ते सिंधी कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावर सुमारे १०० जण दारू विक्री करीत होते. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेला हा प्रकार दुपारी काही प्रमाणात थंडावला. त्यानंतर सायंकाळी वाजेनंतर तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला थांबवून दारू हवी का? अशी विचारणा विक्रेते करताना नजरेस पडत होते. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...