आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Mobile Towers In City, Latest News In Jalgaon

अवैध मोबाइल टॉवर मालमत्ताधारकांना बजावल्या नोटीसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विनापरवानगीतसेच अटी शर्तींची पूर्तता करता उभारण्यात आलेल्या १३१ मोबाइल टॉवरची सेवा बंद का करू नये, यासंदर्भात टेलिकॉम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या आठ मोबाइल टॉवरशी संबंधित मालमत्ताधारकांना पालिकेतर्फे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

इमारतीवर मोबाइल टॉवर उभारणी करण्यापूर्वी पालिकेतून रितसर संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करवून घेणे बंधनकारक असते. यासह इतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यावर पालिका संबंधितांना रितसर परवानगी देऊ शकते. मात्र, शहरातील १३१ मोबाइल टॉवर उभारणी केलेल्या इमारत मालकांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही, तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार संबंधित मिळकतधारकांना मार्च २०१४पासून वर्षभराची मुदत देण्यात आली होती. मात्र, मिळकतधारक किंवा मोबाइल कंपनीतर्फे याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे संबंधित मोबाइल टॉवर सील करण्यासाठी टेलिकॉम विभागाशी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे या टॉवरची सेवा खंडीत का करू नये यासंदर्भात टेलिकॉम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त िवनापरवाना आठ मोबाइल टॉवरची अनधिकृत उभारणी सुरू झाल्याने संबंधित मालमत्ताधारकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहे.