आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Parking Issue At Jalgaon, Fine On Five Luxury Bus

बेशिस्त पार्किंग करणार्‍या 5 लक्झरी बसवर जळगावात कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात प्रवेश करून रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणार्‍या मोठय़ा लक्झरीचालकांना नव्या डीवायएसपींनी दणका दिला आहे. बेशिस्तपणे उभ्या राहणार्‍या या पाच लक्झरीचालकांविरुद्ध मंगळवारी रात्री दंडात्मक कारवाई करत शिस्तीत उभे राहण्याच्या सूचनादेखील प्रशांत बच्छाव यांनी दिल्या.

शहरात रात्रीच्या वेळी मुंबई, पुणे, येथे जाणार्‍या लक्झरी बसेस नेहरू चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर मधोमध अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. त्याच बरोबर दुचाकीधारकांवर दादागिरीदेखील करतात. या लक्झरी बसेसमुळे अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.

स्टेडियमजवळही बेशिस्तपणा
स्टेडियम चौकातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. या चौकातदेखील वारंवार वाहतूक कोंडीची समस्या डोके वर काढत आहे. त्याचबरोबर रात्री आठ वाजेपासून 10 वाजेपर्यंत या रस्त्यावर मोठय़ा लक्झरी उभ्या असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते.

नियमित कारवाईची आवश्यकता
डीवायएसपी बच्छाव यांनी केलेली ही कारवाई नियमित होणे गरजेचे आहे. तरच लक्झरीचालकांना शिस्त लागेल. रेल्वे स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याबरोबरच स्टेडियम चौकातदेखील रात्री या लक्झरींवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची गरज आहे.