आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेसुमार अवैध वाळू उपशामुळे महिन्यांत जणांचा बुडूून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाळूचा ठेका बंद असूनही जिल्ह्यातील नदीपात्रांमधून होणारा बेसुमार अवैध वाळू उपसा आता लोकांच्या जीवावर उठला अाहे. केवळ मीटरपर्यंत उत्खनन बंधनकारक असताना पैशांच्या लोभाने तीनपेक्षा अधिक खोलवर खड्डे,डोह करून सर्रास वाळू उपसा होत असून यामुळे निर्माण झालेल्या खोल खड्यांमध्ये खदाणीत गेल्या महिन्यात बळी गेले आहेत.बुधवारी सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानंतर अवैध वाळू उपसा आणि बेलगाम वाळू माफियाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.खुद्द पारोळ्याचे आमदार रस्त्यावर उतरूनही हा बेकायदा वाळू उपसा सुरुच आहे हे पाहता बेलगाम वाळू माफिया आणि बेफिकीर महसूल प्रशासन आणखी किती तरुणांचे बळी घेणार असा सवाल आहे.
जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत लोकप्रतिनिधींनी अवैध वाळू उत्खननाच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर जागे होत प्रशासनाने कारवाईला प्रारंभ केला. काही दिवस अंमलबजावणी झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’च होते. सर्व नियम धाब्यावर बसवून वाळूमाफिया अवैधरीत्या उत्खनन उपसा करीत असून त्यामुळे नद्या अक्षरश: ओरबाडल्या जाऊन आजूबाजूच्या गावांमध्ये पाणीटंचाईसारखी समस्या निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यांच्या दुरवस्थेला क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूकही कारणीभूत ठरत आहे. अवैध वाळू उपशाचा कहर झाल्यामुळे आमदारांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. आमदार डॉ.सतीश पाटील यांनी एरंडोल तालुक्यात मर्यादेपेक्षा जास्त वाळूचा उपसा करणारे दोन डंपर पकडून प्रशासनाच्या ताब्यात दिले होते.

गिरणेत मर्यादेचे उल्लंघन
वाळूउत्खननाचे नियम धाब्यावर बसून गिरणा नदी पात्रात सावखेडा शिवार, कानळदा, वैजनाथ, धानोरा या गावांमध्ये वाळूमाफियांनी बेसुमार वाळूचा उपसा करून तीन मीटरपेक्षा खोल मोठमोठे खड्डे तयार केले आहेत. जिल्हाभरात हीच परिस्थिती आहे. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठे डोह नदीपात्रात तयार झाले आहेत. वाळू गटांना परवानगी देण्याबाबत आता जिल्हास्तरीय समितीला अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यांकन समिती पर्यावरण आघात निर्धारण प्राधिकरण यंदा अस्तित्वात आले आहे.

दरमहा लाखाेंचा अर्थपूर्ण व्यवहार
जळगाव तालुक्यातील तलाठी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्या पथकांच्या भराऱ्या दिशाहीन झाल्या आहेत. माफियांशी असलेले संबंध जपण्यास प्राधान्य दिले जात आहे. जळगाव जिल्ह्यातून बदलून गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना एका नायब तहसीलदाराचे वाळूच्या माध्यमातून दर महिन्याला होत असलेले अर्थकारण सांगितले होते. वाळूमाफियांच्या हैदोसाबाबत त्यांनी अगतिकता व्यक्त केली होती.

संग्रहित छायाचित्र
हे आहेत जिल्ह्यातील आतापर्यंतचे बळी
१.बाळा तोताराम कुंभार (वय २२,खंडेरावनगर,सावखेडा)
२. श्रीकांत जनार्दन सपकाळे (वय १५,धानोरा)
३. अश्विनी बापू बाबर (वय ३,चहार्डी,चोपडा )
४. गौरव शीतल भालेराव (वय १३,चोपडा)
५. राहुल भरत चौधरी (वय १०, चोपडा)
६. शिवराम केशव पाटील (वय १४, गोंडगाव, ता.भडगाव)
७. आरती केशव पाटील (वय १२, गोंडगाव, ता.भडगाव)
८. सागर भिल्ल (वय वर्षे, गोवर्धन, ता.अमळनेर)

वाळू गटांचे मोजमाप नाही
गेल्यावर्षी जिल्ह्यातील २२ वाळू गटांचा लिलाव करण्यात आला होता. या गटांच्या लिलावाची ३० सप्टेंबर रोजी मुदत संपलेली आहे. नियमानुसार वाळू उपशास बंदी आहे. ठेकेदाराने दिलेल्या मर्यादेत गटांमधून वाळू उत्खनन केल्याबाबत तपासणी तहसीलदारांकडून करण्यात येते. गटांचे मोजमाप करून त्याचा अहवाल खनिकर्म विभागाला सादर करावा लागतो. मात्र, अद्यापही वैजनाथ, लमांजन धानाेरा हे वाळूगट वगळता १९ गटांचा अहवाल तहसीलदारांनी अद्याप सादर केलेला नाही. प्रशासनाने वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया नव्याने राबवण्यास सुरुवात केलेली आहे. मर्यादेपेक्षा जास्त वाळू उत्खनन प्रकरणात दोन ठेकेदारांना पाचपट दंड आकारण्याची कारवाई प्रशासनाने केलेली आहे. मात्र, आता ही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. वाळू उत्खननास बंदी असतानाही जिल्हाभरात अवैधरीत्या वाळू उत्खनन होत आहे.

तीन मीटरपर्यंतच वाळू उत्खनन बंधनकारक
^नियमानुसार गटातूनठेकेदाराला तीन मीटरपर्यंतच वाळूचे उत्खनन करता येते. हे उत्खनन करतानाही दोन मीटर वाळूचा थर त्या ठिकाणी राहू देणे आवश्यक असते. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे १७५ वाळू गटांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १०७ गटांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ५७ वाळूगट लिलाव करण्यास अयोग्य असून, ५० गट योग्य आहेत. नदीपात्रात पाणी असल्याने ६८ गटांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. डॉ.अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा
बातम्या आणखी आहेत...