आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचा अवैध उपसा; १० वाहनांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्रासपणे सुरू असलेल्या वाळूच्या अवैध उत्खनन वाहतुकीविरोधात तहसीलदारांच्या पथकाने शुक्रवारी धडक कारवाई केली. दिवसभरात पाच वाळूचे पाच खडीचे ट्रॅक्टर आणि एक डंपर वर कारवाई केली.
जिल्ह्यात वाळू ठेक्यांची मुदत संपल्यानंतरही सर्रासपणे अवैधरित्या वाळू उत्खनन होत आहे. ‘दिव्य मराठी’ने १४ ऑक्टोबर रोजीच्या अंकात अवैध वाळूच्या उपशामुळे चार महिन्यांत आठ जणांचा बुडून मृत्यू या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर प्रभारी अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी जिल्हाभरातील वाळू गटातून होत असलेले अवैध उत्खनन वाहतुकीविरोधात कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले. जळगावचे तहसीलदार अमोल निकम यांच्या पथकाने सकाळपासूनच अवैध वाळू उत्खनन वाहतुकीविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली होती. जळगावचे मंडळ अधिकारी मिलिंद बुवा, राहुल नाईक, तलाठी फिरोज खान, पी.एम. बेंडाळे यांच्या पथकाने सावखेडा, निमखेडी, गिरणा परिसरात वाळूचा अवैध उपसा वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. कारवाईत दहा ट्रॅक्टर, एक डंपर ताब्यात घेण्यात आले.

कारवाईने पळापळ
कारवाईमुळे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्स डंपरचालकांची चांगलीच पळापळ झाली. पथक येत असल्याचे एकमेकांपर्यंत निरोप पोहोचवण्यात आले. त्यामुळे वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स डंपरचालक सावध झाले. त्यांनी दुपारनंतर वाहतूक बंद ठेवली होती. ताब्यात घेण्यात आलेले १० ट्रॅक्टर्स एक डंपरप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. पकडण्यात आलेल्या वाहनांमध्ये साडेसात ब्रास वाळूचा साठा आढळून आला. या वाळू साठ्याच्या बाजारभावाच्या पाचपट दंड वाहनचालकांना आकारण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...