आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूचा बेसुमार उपसा; नदीचा प्रवाह गावाकडे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गिरणा नदीच्या खेडी, वडनगरी, फुपनगरीजवळील पात्रात बेसुमार वाळू उपशामुळे नदीचा मूळ प्रवाह गावाकडे वळण्याची भीती निर्माण झाली अाहे. खाेऱ्याने पैसे देणाऱ्या वाळू उपशासाठी रान माेकळे असल्याने माफियांमध्ये वाळूसाठी नदीपात्र अाेरबाडण्याची स्पर्धा लागली अाहे. उपशामुळे नदीपात्राला खाणीचे रूप अाले असून वडनगरी गावाला पाणीपुरवठा करणारी नदीपात्रातील विहीर देखील अाटली अाहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने थेट नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यात पर्यावरणाची प्रचंड हानी करणारे विदारक चित्र पुढे अाले अाहे.

पर्यावरण विभागाची परवानगी गृहीत धरून प्रशासनाकडून घाईने वाळू लिलाव केले गेले. त्यातच प्रशासनाचे पर्यावरणापेक्षा वाळूतील महसुली उत्पन्नाकडेच अधिक लक्ष असल्याचे सिद्ध हाेते. खेडी ते फुपनगरी या पात्रामध्ये असलेल्या हजाराे ब्रास वाळूच्या उपशासाठी नदीचे पात्र माफियांच्या टाेळ्यामध्ये वाटणी करण्यात अाले अाहे. परिसरातील कामगारांचा वापर करून दिवस-रात्र वाळू वाहतूक केली जात अाहे. नदीपात्रात ठिकठिकाणी २० ते ५० फुटांपर्यंत खड्डे केल्याने नदीपात्राची चाळणी झाली अाहे.

फुफनगरीला धाेका : गिरणेला अालेल्या पुरांमुळे अनेक ठिकाणी गाळाचे प्रदेश निर्माण झाले अाहेत. निमखेडी अाणि फुपनगरी ही गावे नदीच्या अगदीच किनाऱ्यावर अाहेत. पुरामुळे कधीकाळी गाळाचे ढीग तयार हाेऊन या ढिगांवर मानवी वस्त्या वाढल्या अाहेत. त्यातच नदीपात्रात सुरू झालेल्या बेसुमार वाळू उपशामुळे पावसाळ्यात नदीचा प्रवाह बदलण्याची भीती अाहे. नदीच्या काठावर मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या फुपनगरी गावाजवळ उत्तरेकडून येणारा नदीचा प्रवाह वळण घेत पश्चिमेकडे वळताे. बेसुमार उपशामुळे प्रवाह अाणि प्रवाहाचा वेग गावाच्या दिशेने अधिक गतीने वाढण्याची भीती अाहे. पुराच्या पाण्यामुळे मातीचे ढिगारे खचल्यास फुपनगरी गावालाही धाेका हाेऊ शकताे.

वाहनांची पळापळ : नदीपात्रातील वाळू खाणींमध्ये खाेलवर गेलेले डंपर अाणि ट्रॅक्टरजवळ जाऊनही लक्षात येत नाही. रस्त्याच्या कडेलाच खाेलवर खदानीमध्ये डंपर भरले जात हाेते. कॅमेरा बघताच नव्यानेच वाळू उपशासाठी अालेल्या वाहनधारकांनी पळापळ सुरू केली. दरम्यान, त्यानंतर नदीपात्रात अालेल्या तीन डंपरचालकांनी प्रशासनाकडून अाज इकडे कुणीही फिरकणार नसल्याची खात्री देत वाहन खदानीमध्ये उतरवले.

२४ तास पाेलिस, महसूलचे पथक नेमणार
खेडी ते कानळदा दरम्यान गिरणा नदीतून हाेणारी वाळूचाेरी थांबवण्यासाठी २४ तास पाेलिस अाणि महसूलचे संयुक्त पथक नेमण्याबाबत निर्णय घेतला अाहे. दाेन दिवसांत हे पथक कामाला लागेल. हे पथक वाहनांची तपासणी करेल. वाळूचाेरी करणाऱ्या वाहनधारकांकडून ६२ लाखांचा दंड वसूल केला असून, १० वाहनधारकांवर गुन्हे दाखल केले अाहेत. तसेच कारवाई झालेल्या वाहनधारकांकडून बंधपत्र करून घेतले जात असून, वारंवार वाळूचाेरी करणाऱ्या गाड्या जप्तची कारवाई करण्यात येत अाहे. - गाेविंद शिंदे, तहसीलदार,जळगाव
बातम्या आणखी आहेत...