आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : चालकाने अवैध वाळूचे ट्रॅक्टर घातले तलाठ्याच्या अंगावर, चालकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरसोबत तलाठी मनाेहर बाविस्कर. - Divya Marathi
जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरसोबत तलाठी मनाेहर बाविस्कर.
जळगाव - निमखेडी रस्त्यावरील हिराशिवा काॅलनीत रविवारी सकाळी वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाळूची पाहणी करीत असताना तलाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मधोमध उभा राहताच चालकाने ट्रॅक्टर वळवून तलाठ्याला मधोमध चिरडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तालुका पाेलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक करून ट्रॅक्टर जप्त केले अाहे. 

अाव्हाणे मार्गे निमखेडी रस्त्यावरून ट्रॅक्टरने अवैधरित्या वाळूची वाहतूक हाेत असल्याची माहिती तलाठी मनाेहर शिवराम बाविस्कर (वय ४५, रा. शिवशक्ती काॅलनी) यांना मिळाली हाेती. रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास बाविस्कर यांनी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (क्र. एमएच-१९-एपी-९४०७) अडवले. ट्रॅक्टर चालक संजय राजेंद्र राठाेड (वय २५, रा. निमखेडी) याला बाविस्कर यांनी वाळू ठेक्याची पावती (राॅयल्टी स्लीप) मागितली. त्या वेळी संजय राठाेड याने बाविस्कर यांच्याशी अरेरावी करून वाद घातला. 

वाळूवाहतूक दारांची मुजोरी 
वाळूने भरलेली वाहने भरधाव चालवून लोकांच्या जीवावर ते उठत आहेत. निमखेडी शिवारातून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे दक्ष या चिमुकल्याचा बळी गेला. दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई हुकूम धुडकावून वाळू वाहतूकदार,डंपर चालकांनी मोर्चा काढला होता. या विनापरवानगी मोर्चानंतर वाळू वाहतूकदार मालकांनी शनिवारपासून वाळूची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यानंतर लगेच रविवारी तलाठी बाविस्कर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी कायम असल्याचे या प्रकारामुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 
 
वाळू वाहतूक बंद असतानाही वाहतूक कशी? 
महसूल, पोलिस आरटीओ विभागाकडून होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यात बेमुदत वाळू वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी वाळू वाहतूकदारांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे वाळू वाहतूक बंद असताना निमखेडी शिवारातून वाळू वाहतूक कशी केली गेली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
 
प्रांताधिकाऱ्यांच्या कानउघाडणीनंतर गुन्हा
वाळूचालकाकडून तलाठी बाविस्कर हे तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. या वेळी शासकीय कामात अडथळा करून प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बाविस्कर यांनी केली. मात्र, पोलिसांनी वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याचवेळी मनोहर बाविस्कर यांनी प्रांताधिकारी जलज शर्मा यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घेतलेली भूमिकाही तलाठी बाविस्कर यांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शर्मा यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी कलम ३०७, ३५३, ३७९, ५०६ सह मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. 

पुढील स्लाइडवर वाचा, चिरडण्याच्या उद्देशाने वळवले वाहन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...