आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू वाहतूक करणारे दाेन डंपर, तीन ट्रॅक्टर पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असतानादेखील अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. तहसीलदारांनी पुन्हा वाळूचे दाेन डंपर आणि तीन ट्रॅक्टर जप्त केले. ही वाहने तहसील कार्यालयाच्या अावारातच उभी करण्यात आली आहेत. 

 

गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होणारी वाळू वाहतूक नागरिकांच्या जीवावर बेतली आहे. बहुतांश वाहतूक रात्री आणि पहाटेच्या वेळी केली जात आहे. हे जिल्हा प्रशासनाला माहिती आहे. अवैध मार्गाने डंपर आणि ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा सुरूच त्या विराेधात गेल्या दोन दिवसांत तहसीलदार अमोल निकम यांनी तीन ट्रॅक्टर आणि वाळूचे दोन डंपर जप्त केले आहेत. शुक्रवारी पहाटेदेखील तहसीलदार निकम आणि त्यांचे पथक अवैध वाळू वाहतूकदारांच्या मागावर होते. दरम्यान, वाळू उपशाबाबत धोरण ठरवण्याचे संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले हाेते. मात्र, अद्याप शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...