आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क रुग्णवाहिकेतून जनावरांची अवैध वाहतूक; जळगावातील प्रकार रिक्षाला धडक दिल्याने उघडकीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रुग्णवाहिकेतून जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार जळगाव येथे शुक्रवारी उघडकीस आला. सकाळी भरधाव रुग्णवाहिकेने एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरच एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी रुग्णवाहिकेची पाहणी केल्यानंतर त्यात ६ वासरे बेशुद्धावस्थेत दिसून आली. 

अजिंठा चौफुलीकडून भरधाव रुग्णवाहिकेने एमआयडीसी पाेलिस ठाण्यासमोर रिक्षाला  धडक दिली. त्यात रिक्षाचालक सुभाष साेनवणे जखमी झाले. तरीही चालकाने रुग्णवाहिका न थांबवता अाैरंगाबादच्या दिशेने  वाहन घेऊन गेला. त्यामुळे पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. अार. एल. चौफुलीजवळ गतिरोधक अाेलांडताना रुग्णवाहिकेचे पुढचे टायर फुटल्यामुळे चालक अाणि त्याच्यासाेबतचा तरुण फरार झाला. रुग्णवाहिकेची पाहणी केली असता त्यात सहा वासरे आढळून आली.

दोन वासरे मृत   
सहा वासरे रुग्णवाहिकेत काेंबून अाैरंगाबादकडे घेऊन जात असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. पाेलिसांनी नागरिकांच्या मदतीने ही वासरे खाली उतरवली. त्यातील दाेन मृत झाली हाेती, तर चार जखमी अवस्थेत हाेती. सर्व वासरांना पाेलिसांनी कुसुंबा येथील गोशाळेच्या ताब्यात दिले अाहेत. त्या ठिकाणी दाेन्ही मृत वासरांना पुरण्यात अाले, तर चाैघांवर उपचार सुरू अाहेत. वासरांना इंजेक्शन दिल्याने ते बेशुद्ध अवस्थेत हाेते.

रुग्णवाहिका भाेपाळची...   
वासरे घेऊन जाणारी अपघातग्रस्त रुग्णवाहिका भाेपाळ येथील अाहे. माेहंमद सुमेर यांच्या मालकीची ही रुग्णवाहिका असून दाेन दिवसांपासून हरीश नावाचा चालक रुग्णवाहिका घेऊन गेलेला अाहे. दाेन दिवसांपासून त्याचा माेबाइलही बंद असल्याचे सुमेर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. 

संशय टाळण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर   
जनावरांची अवैध वाहतूक करताना संशय येऊ नये म्हणून रुग्णवाहिकेचा उपयाेग केल्याचा पाेलिसांना संशय अाहे. तसेच  साध्या वाहनाला रुग्णवाहिकेसारखे बनवून अवैध गुरांची वाहतूक करण्यासाठीही उपयाेग करत असल्याची शंका एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुनील कुराडे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पाेलिस शिपाई अश्फाक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.   
बातम्या आणखी आहेत...