आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Trees Cutting At Bhusawal For Holi Festival

वृक्षांवर कुर्‍हाडीचे घाव; महामार्गावर झाडाच्या बुंध्याला आग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- होळीचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात वृक्षांची कत्तल केली जात आहे. हिरव्यागार झाडांवर कुर्‍हाडीचे घाव घालून होळी साजरी करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

होळीत लाकडांबरोबर एरंडाचे झाड जाळण्याची परंपरा असल्याने आता नाल्यांच्या शेजारील एरंडाच्या झाडांवरही कुर्‍हाड चालवली जात आहे. काही वर्षांपूर्वी मोठय़ा नाल्यांच्या शेजारी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून एरंडाची झाडे लावण्यात आली होती. नाल्यातून निरंतरपणे निघणारा मिथेन वायू एरंडाचे झाड शोषून घेते. त्यामुळे वातावरणात मिथेन हा प्राणघातक वायू मिसळला जात नाही. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. मात्र दुर्दैवाने होळीसाठी एरंडाच्या वृक्षांचीही कत्तल सुरू आहे. शहरातील एकाच प्रभागात चार ते पाच ठिकाणी होळी साजरी करण्याची परंपरा आहे. टीव्ही टॉवरचे मैदान, रेल्वे अधिकारी निवासस्थान परिसर, तापीनदीचे खोरे, कंडारी शिवारांत आठवड्यापासून वृक्षतोड सुरू आहे.

होळीसाठी लाकडांचा उपयोग न करता कचर्‍याची होळी केल्यास परिसर स्वच्छतेबरोबर उत्सवदेखील साजरा होईल. शहरात सध्या पालिकेच्या दुर्लक्षामुळे कचर्‍याचे ढीग साचले आहेत. हा कचरा पेटवून परिसर स्वच्छ केला जाऊ शकतो. गुटख्याच्या पुड्या, रस्त्यावरचे प्लास्टिक जाळल्यास पर्यावरणाचे संरक्षण क रता येईल. शहरात‘एक शहर एक होळी’ हा अभिनव उपक्रम राबविल्यास वृक्षांची तोड रोखता येईल.

महामार्गावर झाड पेटवले
जाडगाव फाट्याजवळ रविवारी निंबाच्या वृक्षाला आग लावण्यात आली. वरणगावचे पर्यावरणप्रेमी प्रकाश वायकोळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर माती आणि पाण्याच्या साहाय्याने त्यांनी झाडाच्या बुंध्याला लागलेली आग पूर्णपणे विझवली.

पर्यावरणपूरक उत्सव व्हावेत
होळीसाठी हिरव्यागार वृक्षांची तोड करणे चुकीचे आहे. पालिकेकडून कारवाई केली जाईल. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावे.
-उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ

जनजागृती गरजेची
झाडापासून दरवर्षी मिळणार्‍या ऑक्सिजन वायूचा विचार केल्यास त्याचे मूल्य आठ लाख इतके होते. त्यासोबत पक्षांचा निवारा, सावली ही महत्त्वाची कार्ये झाडे पार पाडतात. एक झाड तोडल्यास साधारणपणे बाजारमूल्यानुसार 500 रुपयात त्याची विक्री होते. सण साजरे करताना ते पर्यावरणपूरक असावेत. नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.
-शशिकांत झांबरे, पर्यावरण अभ्यासक, भुसावळ