आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दुधाच्या दरात अशुद्ध पाण्याची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाटलीबंद पाणी शुद्ध अाणि स्वच्छच असेल, असे डाेळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या जळगावकरांच्या अाराेग्याशी खेळून दुधाच्या भावात अशुद्ध पाणी विक्रीचा धंदा शहरातील गल्लीबाेळात अाणि खेडाेपाडी सुरू झाला अाहे. ज्या अन्न अाैषध विभागावर विश्वास ठेवून नागरिक पाणी पित अाहेत. त्या विभागापर्यंत पाणी मुरत असल्यानेच शहरात अवैध पाणी विक्रीतून दरराेज लाखाेंची कमाई केली जात अाहे. दरम्यान,अशुद्ध पाणी देऊन नागरिकांची फसवणूक करीत अाराेग्याशी खेळणाऱ्या आयएसआय नसलेल्या बाेगस अारअाे प्लांन्टची संख्या जिल्हाभरात १७२ च्या घरात पाेहचली अाहे. केवळ ते अडीच लाखांच्या गुंतवणुकीतून खाेऱ्याने पैसे देणाऱ्या उद्याेगाकडे कथित उद्याेजकांचा सर्वाधिक कल असल्याची माहिती पुढे अाली अाहे.
जिल्ह्यात बीअायएस (ब्युराे अाॅफ इंडियन स्टॅडर्ड) अाणि अन्न अाैषध विभागाने मान्यता दिलेल्या अायएसअाय प्रमाणित ड्रिंकिग वाॅटरचे २२ प्रकल्प अाहेत. याव्यतिरिक्त छाेट्याशा खाेलीत पालिका, बाेअरिंगच्या पाण्यावर अारअाे मशीन लावून जार, पाऊच सर्रासपणे विक्री करणारे बाेगस प्रकल्प १७२ पर्यंत पाेहचले अाहेत. त्यातील ४० प्रकल्प माेठे अाहेत. फुकटच्या पाण्याचा १०० टक्के पैसा हाेत असल्याने अशुद्धच पाणी विक्रीवर उत्पादकांचा भर अाहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. बाटलीप्रमाणे जार अाणि पाऊचवर देखील कंपनीच्या स्टॅडर्ड, नामांकन, बॅच यांचा उल्लेख असणे अावश्यक अाहे. मात्र, यासाठी ग्राहक अाग्रही नसल्याने शहरात विना लेबलचे पाणी जार विक्री केले जातात.

उन्हाळ्यात लाख लिटर पाण्याची विक्री........
जिल्ह्याभरात दरराेज सरासरी ते हजार जार, हजार पाणी बाॅटल बाॅक्स, हजार पाणी पाऊच गाेण्यांची विक्री हाेते. एकट्या जळगाव शहरात २५०० जार, ८०० पाणी बाॅटल बाॅक्स अाणि हजार पाणी पाऊच विक्री हाेतात. लग्न, कार्यक्रमांच्या वेळेत यात २० टक्क्यांपर्यंत वाढ हाेते.

दुधाच्या दरात विक्री
कंपनीतून लिटर पाण्याची बाटली किरकाेळ विक्रेते रुपये नगाप्रमाणे खरेदी करतात. १२ बाटल्यांचा एक बाॅक्स ६५ ते ७२ रुपयांना विकत घेतात. गाईच्या दुधाचा शासकीय खरेदी दर २० रुपये अाहे. विक्रेते चक्क दुधाच्या दरात २० रुपयांना पाणी विक्री करून एका बाटलीमागे १४ रुपये निव्वळ नफा कमवतात.

उत्पादक म्हणून काळजी घेताे......
^मान्यता प्राप्तवाॅटर पॅकेजिंग कंपनीमध्ये निकषांचे पालन केले जाते. जार,बाटली अाणि पाऊचवर अाएसअायचे चिन्ह, बॅच, कस्टमर केअर क्रमांक अादींचा समावेश असताे. ग्राहकांनी ते बघून खरेदी केले तर फसवणूक हाेणार नाही. कुणी अाराेग्याशी खेळत अाहे, असे वाटले तर थेट अन्न अाेैषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली पाहिजे. -सुशील थाेरात, अध्यक्ष,िजल्हा पॅकेज ड्रिंकिंग वाटर असाेसिएशन. जळगाव.

या परवानगीची आवश्यकता
शासकीय मान्यता प्राप्त प्रकल्पासाठी बीअायएस (ब्युराे अाॅफ इंडियन स्टॅन्डर्ड) ची मान्यता अाणि अायएस १४५४३ हे मानांकन, अन्न अाैषध प्रशासन विभागाची परवानगी, प्रदूषण नियंत्रण मंडळाची नाहरकत, शाॅप अॅक्टचा परवाना, अायटीसीनुसार एनएबीएल लंॅबकडून तपासणी रिपाेर्ट, स्माॅल स्केल इंडस्ट्रीचे रजिस्टेशन, प्लॅन्टमध्येच केमिकल, मायक्राेबायाेलाॅजीची लॅब आवश्यक.

बीअायएसच्या स्टॅडर्डनुसार बाटलीबंद, जारच्या शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी किमान ५० लाख ते काेटी रुपयांपर्यंत खर्च येताे. बीअायएस परवानगी, अन्न अाैषध प्रशासन विभाग, टेस्टिंगच्या प्रक्रिया, प्रक्रियेपूर्वी पाणी खरेदीसाठी वर्षाकाठी लाख रुपयापर्यंत खर्च येताे. या घरगुती उद्याेगांमध्ये ते अडीच लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीतून पाणी प्रकल्प सहज उभा केला जातो. या दाेन्ही प्रकल्पांच्या गुंतवणुकीत माेठी तफावत असली तरी कमाई मात्र, सारखीच अाहे.

बीअायएसचे मानांकन मिळवण्यासाठी प्लाॅन्ट सुरू करण्यापूर्वी पाणी उपलब्धतेचा स्त्राेत कळवून पाण्याची पॅकेजिंग मटेरिअलची एनबीएल लॅबकडून तपासणी करावी लागते. मशनरी, अारअाे सिस्टिम यांचा स्टॅन्डर्ड रिपाेर्ट,अन्न अाैषध प्रशासन विभागाकडून परवानगी अाणि अाएसअाय मानांकन मिळाल्यानंतर प्लॅन्टमध्ये केमिस्ट अाणि मायक्राेबायाेलाॅजीसह इन हाऊस २७ तपासण्यात कराव्या लागतात. त्याशिवाय बाहेरच्या नामाकिंत लॅबमधून प्रतिमहिन्याला, सहा महिन्यांला काही तपासण्या करून त्याचे रिपाेर्ट बीअायएसला पाठवावे लागतात. विक्री बाॅचच्या एक्सपायरीपर्यंत सॅम्पल टेस्ट कराव्या लागतात. बाॅटल पॅकेज वाटर प्रक्रियेत एकूण ७४ प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात.