आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर खरेदी विक्रीचे व्यवहार तब्बल ३५ % घटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाने हजार पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. याचा खरेदी विक्रीच्या व्यवहारावरही परिणाम झाला अाहे. यात काळ्या पैशांची गुंतवणूक करण्याचा पर्याय अंगलट येणारा असल्याने ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये झालेल्या व्यवहारांत सुमारे ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे मुद्रांक शुल्क नोंदणी फीतून मिळणारा पाच लाखांचा फटका दुय्यम निबंधक कार्यालयांना बसला आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील दुय्यम निबंधक सहदुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये एकूण ५१५५ खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. या माध्यमातून मुद्रांक शुल्क नोंदणी फीचे शासनाला २० लाख ४६ हजार रुपये मिळाले होते. मात्र, नोटबंदीच्या निर्णयाचा खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर विपरित परिणाम झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात खरेदी विक्रीचे व्यवहार १८३७ने घटून ते ३३१८वर आले. यामुळे नोंदणी फी मुद्रांक शुल्कातही पाच लाखांवर फटका बसून लाख ४७ हजार ९७० रुपयेच मिळाले आहे. या व्यवहारांमध्येही काही जुन्या सौदेपावत्या झालेल्यांचाही समावेश असल्याचे निबंधक कार्यालयातर्फे सांगण्यात अाले.

दोन कोटींचा फटका : १९सहदुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नोव्हेंबर २०१५मध्ये ५८७ खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. त्या माध्यमातून शासनाला कोटी ४८ लाख २२ हजार १८० रुपयांचे मुद्रांक शुल्क नोंदणी फी मिळाली होती. त्या तुलनेत नोव्हेंबर २०१६मध्ये व्यवहारांची संख्या ३३१८पर्यंत कमी झाली. त्याचा मुद्रांक शुल्क नोंदणी फीलाही कोटींवर फटका बसला असून कोटी ४५ लाख ९३ हजार ८२९पर्यंत आकडा खाली आला आहे.
कोट्यवधींचे व्यवहार झालेच नाहीत
^नोटबंदीच्या निर्णयानंतर प्लॉट, घर आणि जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांना खीळ बसलेली आहे. सर्वसाधारणपणे आतापर्यंत बाजारमूल्यापेक्षा या व्यवहारांमध्ये किंमत कमी दाखवून व्यवहार होत होते. आता मुद्रांक शुल्क नोंदणी फी चलनाच्या सहाय्याने भरून खरेदी विक्रीचा व्यवहार धनादेशाद्वारे होत आहेत. धनादेशाद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा होत आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांची आर्थिक कांेडी झाली आहे. हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे कोट्यवधींच्या घरात होणारे व्यवहार जवळपास बंद झाले आहेत. लाखांमध्ये व्यवहार होत आहेत. जमीन, प्लॉट, घर आदींच्या खरेदी विक्रीच्या झालेल्या व्यवहारांमध्ये काळा पैसा वापरण्यावरही मर्यादा आली आहे. त्यामुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारांना ब्रेक लागला आहे. अशोकपाटील, सहजिल्हा निबंधक वर्ग-२
बातम्या आणखी आहेत...