आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उठा उठा दिवाळी झाली... नाेटा बदलण्याची वेळ अाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उठाउठा दिवाळी झाली... ५०० १०००च्या नाेटा बदलण्याची वेळ अाली, ‘अाता येतील खरंच अच्छे दिन’, ज्यांना उधार पैसे दिले ते विचारताहेत भाऊ पैसे कुठे आणून देऊ. अमेरिकन काउंटिंग व्हाेट अॅण्ड इंडियन काउंटिंग नाेट’... यासह असंख्य मेसेजेसने साेशल मीडियात मंगळवारची रात्र बुडून गेली. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ५०० अाणि १००० रुपयांच्या नाेटा बंद करण्याची घाेषणा केल्यानंतर साेशल मीडियात जाेरदार स्वागत करण्यात अाले. देशाच्या अर्थकारणावर माेठा परिणाम करणाऱ्या या घाेषणेचे सकारात्मक परिणामांवर चर्चा करताना करबुडव्यांवर जाेरदार टीका करत हास्याचे फवारे उडवण्यात अाले.
पाचशेहजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करताच तासाभरात शहरातील एटीएम, पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. नागरिकांनी एटीएम केंद्रातील डिपॉझिट मशीनवर नोटा जमा करण्यासाठी तर काहींनी पैसे काढून घेण्यासाठी गर्दी केली. काही वेळातच शहरातील प्रमुख बँकांनी एटीएम केंद्रावर तांत्रिक कारणामुळे एटीएम बंदचे फलक लावले, यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. या बदलाची घरोघरी, गल्लीबोळात, शेकोटीवर तसेच रेल्वेस्थानक, बसस्थानकावरील नागरिकांमध्ये याविषयी एकच चर्चा सुरू होती. व्हॉट्सअॅपवर विनोदी भाषेत याविषयीची खमंग चर्चा सुरू होती.

मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सर्वच प्रसारमाध्यमांवर चलनातील ५०० १००० रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला. येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत या नोटा चलनात असणार आहे. यानंतर डिसेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ग्राहकांना पॅनकार्ड सक्तीचे असणार आहे. यामुळे ग्राहकांचा या मुदतीआधीच त्या जमा करण्याचा कल असणार आहे. या निर्णयाची माहिती मिळताच अनेकांनी जवळील पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी एटीएमवर धाव घेतली. शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँकेसह अन्य विविध बँकांमध्ये निर्णयानंतर साडेआठ वाजेपर्यंत व्यवहार सुरळीत होते. मात्र, या विषयाची चर्चा वाढताच एटीएमवरील गर्दीही वाढली. या वेळी अनेकांनी डिपॉझिट मशीन या पैसे जमा करणाऱ्या मशीनवर तत्काळ ५०० हजार रुपयांच्या नोटांचा भरणा केला. तर काही एटीएम केंद्रांवर पैसे काढणाऱ्यांना पुन्हा ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याचा आग्रह
पाचशे रुपयांच्या नोटा कटवण्यासाठी रात्री नऊ वाजेनंतर पेट्रोल पंपांवरही ग्राहकांची गर्दी वाढली. मात्र, पंपचालकांनीही पाचशे रुपयांचे सुटे देता, संपूर्ण पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याचा आग्रह धरला. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला तर बहुतांश ग्राहकांनी पाचशे रुपयांचे पेट्रोल भरले. यासह हॉटेल व्यावसायिकांनीही पाचशे रुपयांची नोट घेण्यास नाराजी दर्शवल्याचेही दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...