आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महत्त्वाचे साक्षीदार तपासण्याचे काम बाकी, जैन यांच्या अर्जावर गुरुवारी हाेणार निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (ता. ७) सर्वाेच्च न्यायालयात कामकाज हाेणार अाहे. त्यांच्या अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात अाला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार तपासण्याचे काम अद्याप झाले नसल्याने सरकार पक्षाने मुदत वाढवून मागितली अाहे. अातापर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती सादर करण्याची सूचना न्यायालयाने सरकार पक्षाला केली आहे.

घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुरेश जैन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वाेच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर जानेवारीत कामकाज झाले होते. त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय जुलैपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. तसेच याप्रकरणी विशेष न्यायालयात नियमित कामकाज करून साक्षीदार तपासण्याची सूचना सर्वाेच्च न्यायालयाने केली होती. त्यानुसार या खटल्याचे विशेष न्यायालयात नियमित कामकाज सुरू अाहे. अातापर्यंत २१ साक्षीदार सरकार पक्षाने तपासले. अद्याप तपासी अधिकारी, माफीच्या साक्षीदाराची साक्ष झालेली नाही. सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती जगदीशसिंग खैर, न्या. मिश्रा यांच्यासमाेर कामकाज झाले. या वेळी न्यायालयाने या खटल्याच्या प्रगतीची माहिती विचारली. त्यावर सरकार पक्षाने महत्त्वाचे साक्षीदार तपासण्याचे काम झालेले नाही. त्यासाठी बुधवारपर्यंत मुदत देण्याची विनंती केली. मात्र, बुधवारी ईदची सुटी असल्याने गुरुवारी या अर्जावर पुन्हा कामकाज होणार आहे. सरकार पक्षातर्फे निशांत कंठश्वेरकर यांनी काम बघितले.
बातम्या आणखी आहेत...