आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूतस्कर नीलेश देसलेवर एमपीडीए, नाशिक कारागृहात रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गिरणेच्या नदीपात्रात वाळूतस्करी करणे, शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या गिरड (ता. भडगाव) येथील नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली अाहे. राज्य शासनाने एमपीडीए कायद्यात २०१५ मध्ये दुरुस्ती करून वाळूतस्करांनाही या कायद्यात अाणल्यानंतर महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई करण्यात अाली अाहे.

वाळू तस्कर नीलेश देसले यांच्याविराेधात गिरणा नदीपात्रातून वाळूचाेरी करणे, चाेरीची वाळू नाशिक, अाैरंगाबाद येथे विक्री करणे, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, शासकीय कामात अडथडा अाणणे, याबाबत भडगाव पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात अाले हाेते. तर भडगाव तहसीलदारांमार्फत १० वेळेस लाख ३२ हजार ६५० रुपयांचा दंड करण्यात अाला हाेता. वाळूमाफिया म्हणून अाेळख निर्माण झालेल्या नीलेश देसले यांच्यामुसक्या अावळण्यासाठी महसूल विभागामार्फत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात अाला हाेता. याबाबत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अादेश काढले. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अादेशानंतर पाेलिसांनी देसले याची तातडीने नाशिक कारागृहात रवानगी केली अाहे.

एमपीडीए कायद्यात दुरुस्ती : महाराष्ट्रझाेपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, अाैषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धाेकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी असलेल्या अधिनियम सन १९८१, महाराष्ट्र कायदा क्रमांक ५५ सन १९८१ या कायद्यांतर्गत वाळू तस्करांवर कारवाई करण्याची घाेषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली हाेती. त्यानुसार राज्य शासनाने या कायद्यात सन २०१५ मध्ये दुरुस्ती करून त्यात वाळूतस्करांचा समावेश केला. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत वाळू तस्करांवर पहिली कारवाई करण्यात अाली.

अाणखी पाच जणांचे प्रस्ताव
शासकीययंत्रणेवर हल्ले करणाऱ्यांना मुळीच साेडणार नसल्याचा इशारा देत अाणखी जणांचे प्रस्ताव कारवाईसाठी अाल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...