आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामकाजात सुधारणा करा, अन्यथा कारवाई, दप्तर तपासणीतील त्रुटींचा कारणांसह आढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपायुक्त बनकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले - Divya Marathi
उपायुक्त बनकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
भुसावळ - विविध शासकीय विभागातील दप्तर तपासणीतून अनेक त्रुट्या समोर आल्या आहेत. त्यामुळे त्रुट्या दूर करून कामकाजात सुधारणा करा, अशा शद्बात आस्थापना विभागाचे उपायुक्त एस. के. बनकर यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत कारवाईचा इशारा दिला.
पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात गुरुवारी सकाळी उपायुक्त बनकर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिल्या. सहायक उपायुक्त वर्षा पडोळ, नंदकुमार वाणी यांनी दप्तर तपासणीतील त्रुटींचा आढावा घेतला. वैयक्तिक शौचालय बांधकाम, योजनांचा पाठपुरावा अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, कक्षाधिकारी सुनील सूर्यवंशी, कांतीलाल पाटील, सचिन पाठक, गटविकास अधिकारी एस. बी. मावळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार
यांच्यासह एकात्मिक बालविकास प्रकल्प, शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे अधिकारी हजर होते.
चाचणीची प्रक्रिया
शासकीय कार्यालयांमध्ये विविध विभागांमार्फत राबवलेल्या योजनांच्या दप्तरातील नोंदीची तपासणी करून त्याचा निष्कर्ष काढला जातो. या निष्कर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचे अधिकाऱ्यांकडून अहवालात टिपण केले जाते. या टिपणातून योजनांच्या अंमलबजावणीतील अनेक बाबी स्पष्ट होतात.
जनजागृती करा
स्वच्छभारत मिशनअंतर्गत सर्वत्र वैयक्तिक शौचालय उभारणीवर भर दिला जात आहे. विविध शासकीय विभागांमार्फत यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना राबवा. शौचालयांचा नियोजित आकडा गाठा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
तीन तास बैठक
उपायुक्त एस. के. बनकर यांनी अन्य अधिकाऱ्यांसह तब्बल तीन तास बैठक घेऊन सर्व विभागांची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रत्येक विभागातील कामकाजाचा बारकाईने आढावा घेण्यात आल्याने अनेक त्रुट्या समोर आल्या.
.
नियमित तपासणी
-नाशिक विभागीय आस्थापना विभागाचे उपायुक्त बनकर यांनी नियमित दप्तर तपासणी केली. कामकाजात सुधारणा करण्याची सूचना उपायुक्तांनी दिली आहे. त्यानुसार कार्यालयीन कामकाजात सुधारणा केली जाणार आहे.
एस.बी.मावळे,बीडीओ, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...