आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात लाचखाेर नगर अभियंता अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नगरपालिकेची परवानगी घेता दुकानाचे नूतनीकरण केल्याने व्यावसायिकाकडून नगर अभियंता विवेक भामरे याने पाच हजारांची लाच मागितली हाेती. मात्र, लाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून त्याला अटक केली.

वसंत टाॅकीजजवळील मुंबई चाैपाटी भेळ भांडार नावाचे दुकान तीन दशकांपासून सुरू अाहे. गेल्या पंधरवड्यात या दुकानाचे नूतनीकरण करण्यातअाले. पालिकेचे नगर अभियंता विवेक भामरे यांनी या दुकानाला भेट देऊन पालिकेची परवानगी घेता नूतनीकरण केले म्हणून संबंधित व्यावसायिकांकडून पाच हजारांची लाच मागितली. पैसे दिले नाही तर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला हाेता. ही बाब गांभीर्याने घेऊन १८ एप्रिल राेजी दुकानदाराने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे या संदर्भात तक्रार केली. त्यानुसार बुधवारी जलशुद्धीकरण केंद्रात नगर अभियंता निवासस्थानाबाहेर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी पराग साेनवणे यांच्या पथकाने नगर अभियंता भामरेला अटक केली.
धुळ्यात वाहतूक अधीक्षकास पकडले
धुळे |एस.टी. महामंडळाचे प्रभारी विभागीय वाहतूक अधीक्षक हंसराज उत्तमराव पाटील (वय ५५) याला सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. हंसराज पाटील याच्याकडे महामंडळातील एका वाहकाची खातेअंतर्गत चाैकशीची जबाबदारी साेपवण्यात अाली हाेती. चाैकशी लवकरात लवकर पूर्ण करून कमीत कमी शिक्षा देण्यासाठी हसंराज पाटील यांनी संबंधित वाहकाकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत संबंधित वाहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती.