आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिबळ निवड चाचणीत प्रगल्भ अन् अनुष्का प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूंसमवेत फारुख शेख, अॅड. अकिल इस्माइल, वैशाली विसपुते, प्रवीण ठाकरे आदी. )
जळगाव- जिल्हा बुद्धिबळ संघटना जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे १३ वर्षांखालील खेळाडूंची जिल्हा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यात मुलांमध्ये जैन स्पोर्ट्सचा प्रगल्भ चौधरी तर मुलींमध्ये धरणगावची अनुष्का सपकाळे प्रथम आली.
निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ४५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यात पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ते जुलैदरम्यान या स्पर्धा होणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना अॅड. अकिल इस्माइल, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख, मनसेचे महानगरप्रमुख वैशाली विसपुते यांच्याहस्ते चषक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. पंच म्हणून प्रवीण ठाकरे, प्रवीण सोमाणी, परेश देशपांडे यांनी काम पाहिले.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र खेळाडू
जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा प्रगल्भ चौधरी याने पैकी ४.५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर मुकुल तारे याने गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात धरणगावची अनुष्का सपकाळे हिने पैकी गुण मिळवत प्रथम तर साक्षी शिंपी हिने गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला.
बातम्या आणखी आहेत...