आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेपड्यात चार तासांत १३२ मिमी पाऊस; चहार्डी गाव झाले जलमय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील चाेपडा, जळगाव अाणि धरणगाव तालुक्यांमध्ये मंगळवारी रात्री अतिवृष्टी झाली. चाेपडा तालुक्यातील चार तासात १३२ मिमी पाऊस झाला.चहार्डीत चंपावती रत्नावती नदीच्या संगमावर बांधलेल्या काेल्हापूर बंधाऱ्यात गाळ, कचरा, दगड, गाेटे अडकल्याने गावात पाणी शिरले. चहार्डीत अडीच वर्षीय बालिका पाण्यात बुडाली.

चोपडा तालुक्यातील चहार्डीत पाण्यात बुडून अश्विनी बापू बाबर ही अडीच वर्षीय बालिका पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. चोपडा तालुक्यात १६ जनावरे पुरात वाहून गेली. एरंडोलमध्ये एक बैल नाल्यातून वाहून पाझर तलावात बुडाला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चाेपडा तालुक्यात झाला. बुधवारी पहाटे ते वाजेपर्यंतच्या तीन तासांत नदी, नाल्यांना पूर अाला. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावर चाेपडा-हातेड रस्त्यावरील लाकडी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. लासूरमध्ये १९९ मिमी तर चहार्डीत १८५ मिमी पाऊस झाला. चहार्डीत चंपावती रत्नावती नदीच्या संगमावर असलेल्या काेल्हापूर बंधाऱ्यात कचरा अडकला. यामुळे बंधाऱ्याचे पाणी जाण्यास जागाच नसल्यामुळे गावात पाणी शिरले. चहार्डीतील जवळपास २०० ते २५० घरांमध्ये पाणी शिरले. बलवाडी-चाेपडा रस्त्यावरील सत्रासेन गावाजवळचा पूल वाहून गेल्याने रस्ता बंद झाला. अमळनेर तालुक्यात मारवड, शिरुड भागात मुसळधार पाऊस झाला. जळाेदला असलेल्या तापी नदीला पूर अाला. धरणगाव तालुक्यात रात्री ११ ते पहाटे दरम्यान मुसळधार पाऊस झाला. एरंडाेलमध्ये चार तास झालेल्या पावसामुळे अंजनी नदी दुथडी भरून वाहू लागली हाेती.

तिसऱ्यांदा महापूर
चहार्डीत१९८४, २००६ नंतर अाता २०१६ मधील घटनेमुळे तिसऱ्यांदा महापुराने थैमान घातले आहे. केटी बंधाऱ्यांमुळे गावात महापूर आल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत सोनवणेे, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार दीपक गिरासेंकडे करून संताप व्यक्त केला. जनतेच्या भावना ऐकून यासंदर्भात शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल असे सांगून पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले.

अतिवृष्टी केव्हा?
६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटली जाते. चाेपडा, धरणगाव जळगाव तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला अाहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस रावेर ४.१, यावल ९.२ मुक्ताईनगर चाळीसगाव १२,जामनेर २१ तर अमळनेरमध्ये ३७ मिमी पडला अाहे. येत्या २४ तासांत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला अाहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला अाहे.

कारवाईचे दिले आदेश
केटीवेअर बंधाऱ्यात कचरा साचल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झालीे. २० वर्षांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्यात पाणी साचत नाही. उलट या बंधाऱ्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होते. यामुळे हा बंधारा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना बोलवून याेग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. - दीपक गिरासे, तहसीलदार, चोपडा
बातम्या आणखी आहेत...