आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात ४० मिलिमीटर पाऊस, दिवसभराच्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात सोमवारी दिवसभर जाेरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. शहर परिसरात दिवसभरात सुमारे ४० मिलिमीटर नोंद खासगी वेधशाळेने केली आहे.

गेल्या अाठवड्यात दाेन वेळा रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र, सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रामानंदनगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, महाबळ काॅलनी भागात सुमारे अर्धा ते पाऊणतास जाेरदार बरसला. दुपारी ते वाजेपर्यंत वाढीव वस्तीसह संपूर्ण शहरात पाऊस पडला. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचून दुचाकी चालकांची पादचारी नागरिकांची माेठी पंचाईत झाली. त्यातच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने जळगावकरांची गैरसाेय झाली हाेती.

जैनहिल्स परिसरात नोंद
जैनहिल्स परिसरात ४० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. टाकरखेडा येथे ३१ मिलिमीटर, कढाेरा येथे ३२ मिलिमीटर तर धानाेरा येथे ४४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नाेंद झाली आहे, अशी माहिती जैन इरिगेशनच्या सूत्रांनी दिली.

मेहरूण तलावाच्या पातळीत वाढ
पावसामुळेेशिरसाेलीहून जैन हिल्सच्या पाठीमागून येणाऱ्या नाल्यामुळे मेहरूण तलावाच्या पातळीत वाढ झाली. विसर्जन स्थळाजवळ पाण्याची पातळी उंचावल्याचे जाणवत हाेते. तर रावण दहनाच्या चाैथऱ्यालगत पाणी साचले.
बातम्या आणखी आहेत...