आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात बालसंरक्षण अधिकाऱ्याला अटक, वीस हजारांची लाच मागितल्याने कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यास परवानगी देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अाम्रपाली माेरे यांना अटक करण्यात अाली अाहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

तक्रारदाराच्या चुलत भावाचा विवाह २८ फेब्रुवारी २०१६ राेजी नेहा हिच्याशी हाेणार हाेता. त्यापूर्वी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अाम्रपाली माेरे यांनी हळदीच्या कार्यक्रमाच्या वेळी पाेलिसांसाेबत जात नेहा अल्पवयीन असल्याचे सांगून हा विवाह राेखण्याबाबत नाेटीस बजावली हाेती. त्यामुळे तक्रारदारांनी विवाह नंतर करण्याचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी श्रीमती माेरे यांच्याशी तक्रारदाराने संपर्क केला असता. त्यांनी विवाह लावू देण्यासाठी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची मार्च राेजी पंच साक्षीदारांसमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. त्यात अाम्रपाली माेरे यांनी तक्रारदाराचा चुलत भाऊ अल्पवयीन नेहा हिच्याशी काेणताही अडथळा निर्माण करता विवाह लावू देण्याबाबत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पिंपळगावच्या लाचखाेर पीएसअायवर गुन्हा
पाचाेरा पिंपळगाव हरेश्वर येथील पाेलिस उपनिरीक्षक नाना दाैलत अहिरे यांना अाठ हजार रुपयांची लाच घेताना साेमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अहिरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. पिंपळगाव हरेश्वर पाेलिस ठाण्यामध्ये न्यायालयाच्या अादेशान्वये सीअारपीसी १५३ (३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.
बातम्या आणखी आहेत...