आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गीतांजलीसुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये थम्प्स-अपमधून गुंगीचे औषध देऊन प्रवाशाजवळील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह लाख २७ हजारांचा ऐवज लुटण्यात भामटा यशस्वी झाला. नागपूरकडे जाणाऱ्या गाडीने रविवारी दुपारी वाजता भुसावळ जंक्शन स्थानक सोडताच लुटीची ही घटना झाल्याने प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राहुल भुमरे (रा.भंडारा) हे गीतांजली एक्स्प्रेसच्या एस-५ डब्यातील ४० क्रमांकाच्या सीटवर बसून नागपूरकडे प्रवास करीत होते. गाडीने दुपारी वाजेच्या सुमारास भुसावळ स्थानक सोडल्यावर सुमारे ३५ वर्षीय तरुण त्यांच्याजवळ येऊन बसला. या वेळी गप्पा सुरू असतानाच तरुणाने भुमरे यांना थम्प्स-अप पिण्यास दिले. त्यात गुंगीचे औषध मिसळलेले असल्याने अवघ्या काही मिनिटांतच भुमरे बेशुद्ध पडले. मात्र, त्यांना नागपूरजवळ शुद्ध आल्यावर गळ्यात घातलेल्या दोन सोन्याच्या लॉकेटसह हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, दोन मोबाइल असा एकूण लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबवल्याचे लक्षात आले. गीतांजलीने नागपूर स्थानक गाठताच प्रवासी भुमरे यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन आप बिती कथन केली. यानंतर नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून हा गुन्हा तपासासाठी शून्य क्रमांकाने भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांनी या लूट प्रकरणाची सर्व माहिती जाणून घेतली. पोलिस उपनिरीक्षक दिलीप वानखेडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

>नागपूर येथून शून्य क्रमांकाने आमच्याकडे वर्ग झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. गुंगीचे औषध प्रवाशांना देऊन लुटणाऱ्या रेकॉर्डवरील संशयितांची माहिती काढत आहोत. गीतांजली एक्स्प्रेस प्रकरणीदेखील आरोपीला हुडकून काढू. आनंदमहाजन, निरीक्षक,लोहमार्ग पोलिस ठाणे, भुसावळ

>चहा, बिस्कीट,शीतपेयांचा वापर : शीतपेयांतूनगुंगीचे औषध देऊन लुटमारीच्या होणाऱ्या घटना पाहता प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशाने काळजी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीकडून कोणताही खाद्यपदार्थ अथवा पेय घेणे, विशेष करून चहा, शीतपेय, बिस्कीट, पोळी यात गुंगीचे औषध टाकून फसगत होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे.

>जेवणातही धोकाशक्य : अनेकदासहप्रवाशाकडे जेवणाचा डबादेखील सोबत असतो. एखाद्याच्या आग्रहाला बळी पडून आपण त्याच्यासोबत जेवण करतो. मात्र, येथेदेखील धोका होऊ शकतो. काही लुटारू संशय टाळण्यासाठी वरच्या चांगल्या पोळ्या स्वत: खातात. गुंगीचे औषध मिसळलेले पदार्थ इतरांना देऊन हेतू साध्य करतात.

यादीवरील गुन्हेगारांचा शोध
यापूर्वीसुरत-भुसावळ या रात्रीच्या पॅसेंजरमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांचे साहित्य लुटीचे प्रकार घडलेले आहेत. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. संपूर्ण विभागातदेखील अशी घटना गेल्या तीन महिन्यांत उघडकीस आलेली नाही. मात्र, रविवारी गीतांजली एक्स्प्रेससारख्या सुपरफास्ट गाडीत दिवसा झालेल्या लुटीच्या प्रकाराचा तपास करणे पोलिसांसमोरील आव्हान आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास सुरू झाला असून लोहमार्ग पोलिसांनी भुमरे यांना यादीवरील काही गुन्हेगारांची छायाचित्रे दाखवली आहेत. सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत.