आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेच्या लाटेत बरसतील सरी, पुढील तीन दिवसांत वातावरणात हाेणार बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चैत्र महिन्यात अालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शहरवासीय हैराण झाले अाहेत. वातावरणातील चढ-उतार सुरू असल्याने तापमान ४३ अंशांच्या पुढे जात अाहे. या उष्णतेच्या लाटेत २८ ते ३० एप्रिलदरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अाणि विदर्भात पावसाच्या सरी काेसळण्याची शक्यता अाहे. असा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला अाहे.

शनिवार अाणि रविवारी तापमान ३७ अंशांपर्यंत खाली अाल्याने जळगावकरांना उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला हाेता. परंतु साेमवारपासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला. तापमान ३९ अंशांवरून थेट ४२.५ अंशांपर्यंत पाेहोचले. वाऱ्याचा वेगही अधिक असल्याने उष्णतेच्या झळांमुळे ४२.५ अंश तापमानाची तीव्रता ४५ अंश तापमानाएवढी जाणवत हाेती. तापमानात अाणखी वाढ हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना हेच तापमान कायम राहून येत्या तीन दिवसांत राज्यात पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवण्यात अाली अाहे.