आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जून महिन्यामध्ये पाऊस ४० टक्के कमी बरसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यावर्षी अपेक्षित वेळेपेक्षा उशिराने अागमन झालेला मान्सून प्रथमच विदर्भामार्गे जिल्ह्यात दाखल झाला. हवामान खात्याने जून महिन्यात तब्बल ११० टक्के पाऊस येण्याचा अंदाज बांधला हाेता. परंतु, जूनअखेरीस जिल्ह्यात अंदाजाच्या ४० टक्के कमी पर्जन्यमान राहिले. जळगाव जिल्ह्यात ३० जूनपर्यंत ७०.६ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १३० मिलिमीटर पाऊस हाेताे. यावर्षी मात्र ९१.८ मिमी पाऊस झाला. धरणगाव तालुक्यात ६.७ टक्के एवढा कमी पाऊस झाल्याची नाेंद अाहे. जून महिन्यातील पावसाच्या अंदाजाप्रमाणे जळगाव, भुसावळ,चाेपडा, पाराेळा अाणि चाळीसगाव तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.
बातम्या आणखी आहेत...