आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जून महिन्यातही तापमान ४० अंश; मान्सूनची प्रतीक्षाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मान्सून अागमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांना पुन्हा तापमानाच्या चाळिशीचा चटका सहन करावा लागत आहे. दाेन दिवसाचा ऊन सावळीचा खेळ रविवारी दिसून आला. पश्चिम महाराष्ट्र, काेकण मुंबईत मान्सूनचे अागमन हाेत असल्याने राज्यभरात समाधान व्यक्त हाेत अाहे. मुंबईत मान्सून अाल्यानंतर लवकरच ताे उत्तर महाराष्ट्रात दाखल हाेईल या अाशेने जळगावर पावसाची वाट पाहत अाहे; पण त्या सर्व अाशा फाेल ठरत अाहे. रविवारी शहराचे तापमान ४० अंशांकडे झेपावल्याने प्रचंड उकाडा जाणवत हाेता.
अवकाळीची शक्यता : अरबीसमुद्रात मान्सूनच्या प्रगतीचा वेग कायम असून दाेन दिवसांत बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला जाईल. तसेच महाराष्ट्रातदेखील मान्सून पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त केला अाहे. मध्य, उत्तर महाराष्ट्र विदर्भात अवकाळी पाऊस दणका देण्याची शक्यता अाहे.
बातम्या आणखी आहेत...