आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन काेटींचे बिल काढल्याचा शिवसेनेचा अाराेप; कर्मचाऱ्यांचे दडपशाहीविराेधात काम बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- महापालिकेचीअार्थिक स्थिती खराब असताना नवीन पाणीपुरवठा याेजनेचे साडेतीन काेटींचे बिल काढल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांचा संताप झाला. बिल का काढले याचा जाब विचारत नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी इतर विराेधकांनी बिलाची फाइल ताब्यात घेतली. त्यावरून महापालिकेत वादाची ठिणगी पडली. फाइल ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर नगरसेवक दादागिरी करतात म्हणून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद अांदाेलनाचा पवित्रा घेतला. या वेळी अावारात नगरसेवकांच्या दडपशाहीविराेधात घाेषणाबाजी झाली.

१५२ कोटींच्या पाणी योजनेचा चाैकशी अहवाल अाल्याशिवाय बिल मंजूर करू नये, असा ठराव मनपाने केला अाहे. तरीही दि. जुलै राेजी अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांनी याेजनेच्या कामाचे नियमित साडेतीन काेटींचे बिल मंजूर केले. याची कुणकुण विराेधकांना लागली. विराेधी पक्षनेते संजय जाधव, गटनेते संजय गुजराथी, नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी लेखा विभागात जाऊन त्याची चाैकशी केली. त्या वेळी बळवंत एस. रनाळकर यांच्याकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी फाइल अायुक्तांकडे असल्याचे सांगितल्याने फाइल अायुक्तांकडे का? अशी विचारणा करीत त्यांना धारेवर धरले. त्यामुळे लेखा विभागात गाेंधळ उडाला. बघ्यांची एकच गर्दी झाली. त्या वेळी बळवंत एस. रनाळकर अायुक्तांशी चर्चा करण्यास अाणि फाइल घेण्यासाठी गेले. या दरम्यान महापाैर जयश्री अहिरराव या महापालिकेत अाल्या. त्यांनाही विराेधकांनी लेखा विभागात बाेलावून ठरावानंतरही अायुक्तांनी बिल मंजूर केल्याची माहिती दिली. त्यानंतर बळवंत रनाळकर, लेखाधिकारी एम.अार.सराई हे फाइल घेऊन अाले. त्यांच्याकडील फाइल ताब्यात घेऊन विराेधकांनी ती विराेधी पक्षनेत्याच्या दालनात नेऊन गुन्हा दाखल केल्यानंतरच फाइल परत देऊ, अशी भूमिका घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशीही संपर्क साधण्यात येईल, असे नरेंद्र परदेशी यांनी सांगितले. यातच कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने गाेंधळात भर पडली.

पाणीपुरवठायाेजनेतील गैरप्रकार, निकृष्ट काम जनतेसमाेर अाणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच जनअांदाेलन उभारण्यात येईल, अशी माहिती संजय गुजराथी यांच्याकडून देण्यात अाली. त्यासाठी सेवाभावी संस्था अाणि इतरांनाही यात सहभागी करून घेऊन पक्षश्रेष्ठींबराेबर चर्चा करून स्वतंत्र समिती गठीत केली जाणार असल्याचेही विराेधी पक्षाकडून सांगण्यात अाले. तसेच कर्मचाऱ्यांना काम बंद करण्याबाबत अायुक्तांकडूनच प्राेत्साहन दिले गेल्याचाही अाराेप विराेधकांनी केला.

अिधकाऱ्यांना अपशब्दाचा वापर झाल्यावरून घोषणाबाजी करताना कर्मचारी.
पाणी योजनेचे बिल काढल्याचा मिळाला पुरावा. तर दुसऱ्या छायाचित्रात फाइल हिसकावून नेताना नरेंद्र परदेशी हतबलतेने पाहताना महापौर.
अाजपासून काळ्या फिती
नगरसेवकसंजय गुजराथी, नरेंद्र परदेशी यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या िशवीगाळ, दमबाजीच्या विराेधात कामगार, कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद अांदाेलन अायुक्तांबराेबर झालेल्या चर्चेनंतर स्थगित केले. संबंधितांवर कठाेर कारवाईची मागणी अांदाेलनातून केली गेली. त्यानुसार दाेघांवर प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने अांदाेलन मागे घेतले अाहे. मात्र, उद्या बुधवारपासून कर्मचाऱ्यांकडून या घटनेच्या िवराेधात काळ्या िफती लावून काम केले जाणार अाहे.

कोण काय म्हणतात...
काेणत्याहीप्रकारची माहिती मिळवण्याचा नगरसेवकांना अधिकार अाहे. त्यासाठी काेणत्याही कर्मचाऱ्याला दमबाजी केली नाही. मात्र, केवळ अायुक्तांच्या सांगण्यावरून अाणि तेही पाणी याेजनेच्या ठेकेदाराच्या बिलाच्या मुद्द्याबाबत कर्मचाऱ्यांकडून काम बंद अांदाेलन पुकारणे चुकीचे अाहे. कर्मचाऱ्यांना अचानक काम बंद करण्याचा काेणताही अधिकार नाही. त्याबाबत मनपाच्या ठरावाचा त्यांच्याकडून अवमान केला गेला अाहे. -संजय गुजराथी, गटनेता, शिवसेना

काेणत्याहीप्रकारचे चुकीचे बिल अापण काढलेले नाही. केवळ नियमित बिलाची प्रक्रिया केली अाहे. प्राथमिक अहवाल नील अाल्यानेच ही प्रक्रिया केलेली अाहे. त्याबाबत काेणत्याही प्रकारचे कागदपत्र पाहू शकतात. तसेच ते मिळवण्याची पद्धत अाहे. त्यासाठी फाइल हिसकावणे चुकीचे अाहे. प्रत्येक काम कायद्यानुसार झाले पाहिजे. कायदा ताेडणाऱ्यांना याेग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्यापूर्वी अापल्याला कल्पना दिली अाहे. डाॅ.नामदेव भाेसले, अायुक्त, महापालिका

पाणीपुरवठायाेजनेचे काम चांगले व्हावे. त्याचा दर्जा चांगला राहावा यासाठी अापण प्रयत्नशील अाहाेत. त्यामुळेच विराेधकांच्या मागणीनुसार या विषयावर महासभाही घेण्यात अाली. त्यानंतरही ठेकेदाराचे बिल काढले जात असल्याचे समजल्यावर राेजी अायुक्तांना पत्र देऊन महासभेत झालेल्या चर्चेनुसार चाैकशी अहवाल अाल्याशिवाय बिल काढण्याबाबत कळविले हाेते. त्यामुळेच चेक निघाला नाही. -जयश्री अहिरराव, महापाैर, धुळे महापालिका
कर्मचाऱ्यांनाअधिकाऱ्यांनी सांगितलेले काेणतेही काम करणे गरजेचे असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना दाेषी ठरवून त्यांना अपशब्द वापरीत दडपशाही करणे चुकीचे अाहे. अशा प्रकारामुळे कर्मचारी मानसिक दबावाखाली काम करू शकत नाही. त्यामुळेच काम बंदचा निर्णय घेतला अाहे. -भानुदासबगदे, कामगार संघटना पदाधिकारी
अपात्रतेची हाेऊ शकते कारवाई
कर्मचाऱ्यांनीएप्रिल, मे महिन्यात वेतनासाठी अांदाेलन केल्यानंतर महासभेत त्याबाबतही ठराव करण्यात अाला अाहे. त्यानुसार एक महिन्याची नाेटीस दिल्याशिवाय काेणत्याही प्रकारचे अांदाेलन कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. मात्र, बिल मंजुरीबाबतच्या ठरावाबाबत जाे प्रकार झाला ताेच प्रकार अांदाेलनाबाबतही झाला. केवळ ताेंडी सूचना देत कर्मचाऱ्यांकडून काम बंद अांदाेलन केल्याने विविध कामासाठी अालेल्या नागरिकांना परत जावे लागले. आयुक्तांसह कोणत्याही अिधकऱ्यांना कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...