आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना बैठकीत पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांना दिली तंबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येणारा काळ हा निवडणुकांचा राहणार अाहे. शिवसेना स्वबळावर सर्व निवडणुका लढणार अाहे. त्यामुळे कामाला लागा, काम करायचे नसेल तर नाहक पदे उबवू नका. स्वत:हून बाजूला हाेत सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या, अशा शब्दात शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी पक्षाच्या नावावर दुकाने चालवणाऱ्यांना तंबी दिली. नेत्यांना रिझल्ट हवाय, पक्ष अाहेत तर अापण अाहाेत अशा शब्दात पदे अडकवून ठेवणाऱ्यांची खरडपट्टी काढली.

शिवसेनेचा १९ जून राेजी ५०वा वर्धापन दिन अाहे. पक्ष ५० वर्षांचा हाेत असल्याने यंदा जोरदार कार्यक्रमांचे नियोजन केले अाहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी दुपारी वाजता शिवसेनेच्या जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक जिल्हा परिषद अाणि पंचायत समितीच्या सदस्यांची बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. या वेळी शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, अामदार चंद्रकांत साेनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील अादींनी मार्गदर्शन केले. या वेळी १५ जून ते १८ जून दरम्यान जिल्हा, तालुका शहर, गाव पातळीपर्यंत जिथे शाखा तिथे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात अाले अाहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने दुष्काळग्रस्त भाग, शेतकरी, अात्महत्याग्रस्तांचे कुटुंब, जलयुक्त शिवार अादी क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती जनतेसमोर मांडण्यासाठी पाेस्टर्स बॅनर तयार केले अाहेत. १९ राेजी प्रत्येक चाैकांचे सुशोभिकरण करणार असून संदेश देणारे एकसारखे फलक लावले जाणार अाहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर एकाही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्याचे फाेटाे लावण्याची सूचनाही केली अाहे. प्रत्येक तालुक्यात चित्ररथ तयार करून जनतेपर्यंत पक्षाने केलेल्या कामांची माहिती पोहोचवली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख वाघ यांनी सांगितले.

गावाच्या वेशीवर फलक लावा
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त गाव, शहर तालुकापातळीवर विविध उपक्रम राबवण्याचे अावाहन उपनेते तथा अामदार गुलाबराव पाटील यांनी केले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने प्रवेशासाठी मदत केंद्र, शाळांमध्ये कॉलेजमधील गुणवंतांचा सत्कार, ना नफा ना ताेटा तत्त्वावर वह्यांचे वाटप करून ग्रामीण भागात मदतीचा हात द्या. दुष्काळी परिस्थितीत अनेक विकासाची कामे केली, त्याची माहिती पाेहाेचवा. जिल्ह्याच्या राजकारणात काय प्रहार करायचे ते केले, अाता अापण काय करताेय याकडे लक्ष लागून अाहे. शिवसेना ही पाेक्तपणात अालेली संघटना अाहे. समन्वयकांशी कार्यकर्त्यांच्या मनातील दरी कमी करावी. गावाच्या वेशीवर शिवसेनेचे फलक लावा. संघटना जिवंत राहिली तर अापण जिवंत राहू, असेही अामदार पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेमध्ये स्वबळावर सत्तेत येऊ
मागच्या काळात पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अाता परिस्थिती बदलली अाहे. तरुणांना शिवसेनेत यायचे अाहे. काम करायचे अाहे. त्यामुळे ज्यांना काम करायचे, नाही त्यांनी पद साेडावे इतरांना संधी द्यावी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यभर फिरताय, अाज सत्तेत असूनही शेतकऱ्यांसाठी विराेधकाचीही भूमिका पार पाडली जातेय. निवडणुका तोंडावर असून त्याचा फायदा घेता येईल. त्यासाठी कॅम्पेन राबवून लोकांपर्यंत पोहोचता येईल. जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्तेत येऊ, असे अावाहन प्रा. साेनवणेंनी केले.