आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In One & Half Year 94 Male female Missing From Chalisgoan

चाळीसगाव परिसरातून दीड वर्षात 94 जण बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- चाळीसगाव शहर व पोलिसठाण्यांतर्गत गावांमधून गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत 94 जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी जवळपास 58 जणांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. उर्वरित 36 जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये तरुण मुली व महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. महिलांच्या बरोबरीने पुरुषांचेही प्रमाण अधिक आहे. तरुण मुले व मुलींचे पळून जाण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महिलांचा समावेश अधिक- बेपत्ता झालेल्यांमध्ये जानेवारी 2012 ते मार्च 2013 पर्यंत तरुण मुलांची हरवलेल्यांची संख्या 23, तरुण मुलींची 11, पुरुषांची 32, स्त्रियांची 35 इतकी संख्या आहे. तरुण मुली व महिला बेपत्ता असल्याच्या सर्वाधिक नोंदी पोलिसात आहेत. पोलिसांकडून शोध घेण्यात आलेल्यांमध्ये आतापर्यंत सहा मुली, 13 स्त्रिया व 17 पुरुषांचा शोध घेणे बाकी आहे. तरुण मुली व मुलांचे पळून जाण्याचे व बेपत्ता झाल्याचे प्रमाणही वाढत आहे, पालकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.

कौटुंबिक नैराश्य, मानसिक संतुलनाने ग्रासलेले, आई-वडिलांच्या दबावाला कंटाळलेले, मनासारख्या क्षेत्रात काम करू न देणे ,विविध छळाला कंटाळल्याची कारणे आहेत. प्रेमसंबंधाचे कारणही तरुण-तरुणीमध्ये आढळते. यामुळे अनेक जोडपे पळून जातात. बेपत्ता झालेल्या अनेक पालकांना अनेकदा योग्य कारणे समजून येत नाहीत. मात्र एखादी घटना घडल्यानंतर पालकांना जाणीव होते. यासाठी पालकांनी तरुण मुलांना व मुलींना चांगले संस्काराचे धडे दिले पाहिजेत. मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांच्या भावनाही समजून घेणे गरजेचे आहे. योग्य वेळी, योग्यरित्या समज दिल्यास तरुण, तरुणींना वास्तवतेची जाणीव होऊ शकते. तरुण मुला-मुलींवर दबाव न टाकता त्यांच्या आवडी-निवडीचाही विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. जेणेकरून संभाव्य बेपत्ता होण्याचा प्रकार रोखण्यास मदत होईल. नैराश्यमय वागणूक मिळाल्यास अनेक जण कंटाळून बाहेरगावी निघून जातात तर काहीजण जीवनाचा कंटाळून आत्महत्या करण्याला भाग पडत असतात.

पालकांनी सतर्क असावे- आपला मुलगा व मुलगी शाळा, कॉलेज किंवा अन्य ठिकाणी केव्हा जातात, केव्हा येतात? काय करतात याबाबत पालकांनी सतर्क रहावे. वेळप्रसंगी त्यांची चौकशी केली पाहिजे. फेसबुक, इंटरनेट व मोबाइलमुळे तरुणांचे संपर्क लवकर जुळून येतात. तरुण-तरुणींचे पळून जाण्याचे प्रमाण परीक्षेच्या कालावधीत अधिक असते. प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी