आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करात १०% सूट; महिनाभरात 6 काेटींचा भरणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या महिनाभरात मालमत्ता कराचा भरणा करा अाणि १० टक्के सूट मिळवा, अशी अभिनव याेजना पालिकेने सुरू केली अाहे. त्याला जळगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. बिलांची वाटप झालेली नसतानाही यंदा एप्रिल महिन्यात तब्बल काेटी ७० लाख ३५ हजारांचा भरणा झाला अाहे. विशेष म्हणजे साेशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमांनी केलेल्या अाव्हानाला प्रतिसाद देत यंदा मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 2 ते 5 काेटी लाख रुपयांची वाढ झाली अाहे.

महापालिका प्रशासनाला गेल्या काही वर्षांत मालमत्ता कराच्या वसुलीत येणाऱ्या अपयशामागील कारणांचा शाेध घेत सर्वच प्रभाग अधिकाऱ्यांनी यंदा सुरुवातीपासूनच कामाला सुरुवात केली अाहे. चार भागात विभागणी झालेल्या जळगाव शहराच्या चारही प्रभाग कार्यालयांच्या माध्यमातून कर वसुलीवर सुरुवातीपासूनच भर दिला जात अाहे. यामागे मालमत्ता करात वाढ हाेणे हा उद्देश अाहेच साेबत नागरिकांना वेळेवर माहिती मिळत नसल्याने त्यांना प्रशासनाकडून मिळणाऱ्या याेजनांचा फायदा व्हावा हे देखील मुख्य कारण अाहे. त्यामुळे पालिका प्रशासन अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदींनुसार घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पाेहचवण्यात यशस्वी हाेत अाहे.

महापालिकेने साेशल मीडियासह पत्रके वाटून केली जागृती
1. पालिकेने ३१ मार्चपूर्वी नागरिकांना कर भरण्यासाठी घराेघरी जाऊन सूचना केली हाेती. त्यानंतर एप्रिल महिन्यात भरणा केल्यास एकूण बिलाच्या १० टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती व्हाॅट‌्सअॅप, घराेघरी पत्रके वाटून तसेच रिक्षाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात अाली.

2.मनपाने जनजागृती केल्याचा मोठा फायदा झाला असून ते ३० एप्रिल २०१६ दरम्यान चारही प्रभाग समितींमध्ये घरपट्टीची काेटी ९२ लाख ९४ हजार ४६४ रुपये तर पाणीपट्टीची काेटी ७७ लाख ४१ हजार ४१४ रुपये भरणा झाला अाहे. एकूण भरणा काेटी ७० लाख ३५ हजार ८७८ रुपये अाहे.
3. गेल्या वर्षी एप्रिल २०१५ मध्ये मालमत्ताकराची वसुली काेटी ६५ लाख हजार ५३१ रुपये हाेती. विशेष म्हणजे यंदा एप्रिल महिन्यात मागील मागणीची वसुली ५४ लाखांची तर चालू वर्षाची मागणी काेटी १६ लाख ३५ हजार १५५ रुपये वसुली झाली अाहे.

अाता 7 % सूट
प्रशासन अाता १० टक्के वसुलीत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अाता जुलैअखेर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना टक्के सूट देण्याच्या तयारीत अाहे. यासंदर्भात लवकरच मान्यता मिळाल्यानंतर सूट दिली जाणार अाहे. त्या दृष्टीनेही अाता पालिका प्रशासन एसएमएसच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार अाहे. - विलास साेनवणी, प्रभाग अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...