आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भेटी लागी जीवा', विठ्ठलाच्या भेटीसाठी भक्त घेतोय कराटे प्रशिक्षण... पहा फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एखादी गोष्ट करण्यासाठी मनाचा दृढनिश्चय केला तर काहीही अशक्य नसते आणि त्याला वयाचे बंधनही नसते असे म्हटले जाते. जळगावच्या 65 वर्षीय राजाराम ढाके यांनी हे सत्यात उतरवले आहे. ढाके हे दरवर्षी आषाढीवारी करतात. यासाठी पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ते जळगाव ते पंढरपूर पायी दिंडी पूर्ण करतात. पण शहरात राहत असल्याने शेतीचे काम नाही. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहणार नाही, आणि त्यामुळे आपल्याला
वारी पूर्ण करता येणार नाही असे ढाके यांना वाटले. त्यामुळेच विठ्ठलाच्या भेटीसाठी तंदुरुस्ती कायम रहावी म्हणून वयाच्या ६५ व्या वर्षीही ढाके यांनी कराटे शिकण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या एक महिन्यांपासून ढाके के कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह असल्याचे त्यांचे प्रशिक्षक सांगतात. दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली असते. त्याच ओढीने वारी पूर्ण करतो. पण शरीराने साथ दिली नाही तर, सख्या पांडुरंगाला कसे भेटणार असा विचार मनात आला, आणि कोणताही विचार न करता कराटे सुरू केल्याचे ढाके म्हणाले.

पुढील स्लाईड्सवर पहा ढाके यांचे प्रशिक्षणाचे काही फोटोज...