आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेतून तरुणींना मिळताहेत स्वरक्षणाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आठवीपासून ते बारावीपर्यंतच्या ४५ विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्याचे शिबिर मेपासून कन्या शाळेत सुरू झाले आहे. राष्ट्रसेविका समितीतर्फे हे शिबिर घेण्यात येत आहे.

दररोज सायंकाळी ते ७.३० या वेळेत कन्या शाळेच्या मैदानावर हे शिबिर होत आहेत. यात स्वरक्षण करण्यासाठी लाठीचा वापर, युद्धप्रसंगी घ्यावयाची दक्षता, काळजी यासंदर्भात मार्गदर्शन दिले जाते आहे. नंदुरबार येथील अश्विनी पवार, वृषाली वावदे, बीड येथील मयुरी जोशी जळगावच्या भाग्यश्री मनोहर या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर औरंगाबादच्या उज्ज्वला अट्टेकर या शिबिरप्रमुख आहेत. शिबिरात जळगावसह भुसावळ, जालना, बीड, नंदुरबार, धुळे, नागपूर, अंबड येथील ४५ मुली सहभागी झाल्या आहेत. १९ तारखेला समारोप होणार आहे. वर्षा ओक, वंदना ओक, प्रिती झारे, अलका नाईक, हेमा लिमये आदी सहकार्य करीत आहेत.

‘लेक वाचवा’वर तक्ते तयार
गेल्यादोन दिवसांपासून शिबिरार्थी विद्यार्थिनी ‘लेक वाचवा’ या विषयावर तक्ते तयार करीत आहेत. पुण्यभूमी, भारतीय सण, तरुणींपुढील आव्हान यासारखे चर्चासत्रही घेतले जात आहेत. यातून बौद्धिक क्षमता वाढवली जाते आहे. शिवाय एकत्रितरीत्या केल्या जाणाऱ्या उपक्रमातून संघिक भावना शिकायला मिळत आहेत.
नऊ वर्षांनंतर शहरात शिबिर
यंदाहोत असलेले राष्ट्रसेविका शिबिर हे वर्षांनंतर जळगाव शहरात होत आहे. या पूर्वी २००४ मध्ये असे शिबिर झाले होते. याला शिक्षावर्ग असेही संबोधले जाते. सकाळी ते रात्री १० या वेळेत वेगवेगळ्या सत्रात वर्ग घेतले जात आहेत. विशेष म्हणजे खेळांच्या माध्यमातून समरसता शिकवण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळवले जात आहेत. योगासने, व्यायाम, लेझीम, बौद्धिक कार्यशाळांच्या माध्यमातून युवतींमध्ये आत्मविश्वास वाढवला जातो आहे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थिनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत. त्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे.
बातम्या आणखी आहेत...