आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवडाभरातच दाखले मिळणार, शहरातील २६ महा ई-सेवा केंद्रांवर करता येईल अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बारावी आणि सीबीएसई दहावीचे निकाल लागले आहेत. येत्या दोन महिन्यांत सर्वत्र प्रवेशाची धामधूम राहणार आहे. विविध शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे वेळेत उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात आणि पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. हा मनस्ताप टाळण्यासाठी विद्यार्थी पालकांनी निकालानंतर लागेच महसूल विभागाकडे आवश्यक ते दाखले मिळवण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना आठवड्यात दाखले उपलब्ध होऊ शकणार आहे.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, तंत्रनिकेतन, औषधनिर्माणशास्त्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तसेच अनेक शैक्षणिक कोर्सेससाठी प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला, रहिवास, वय, राष्ट्रीयत्व, अधिवास, जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर आदी दाखल्यांची आवश्यकता असते. यातील बहुतांश दाखले काढण्यासाठी पालक प्रवेशाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज करतात. तर काही पालक अर्ज केल्यानंतर महसूल यंत्रणेकडे अर्ज केल्यानंतर पंधरवडा किंवा महिन्याभरानंतर विचारणा करतात. यंत्रणेकडून वेळेत दाखला उपलब्ध झाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे प्रकार दरवर्षी घडत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी निकाल लागल्यानंतर लागलीच महसूल यंत्रणेकडे विविध शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळावे म्हणून अर्ज केल्यास त्यांना आठवडाभराच्या आत दाखले मिळणार आहे. यासाठी शहरातील २६ महा ई- सेवा केंद्रांवर हे अर्ज उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यासाठी ११ १२ जून राेजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवीनगर येथे शिबिर आयाेजित करण्यात आले आहे.
तत्काळ दाखले उपलब्ध
- महाई-सेवा केंद्रावर कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज केल्यास नागरिकांना सात दिवसांत दाखले उपलब्ध हाेतात. सध्या गर्दी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी उपलब्ध करून दिले जात आहेत. राजस्व अभियानामुळे दाखल्यांची मागणी कमी झाली आहे.
गोविंद शिंदे, तहसीलदार, जळगाव.
विद्या‌र्थ्यांच्या कामाला प्राधान्य
- शैक्षणिक प्रवेशासाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देणार आहोत. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ओळखपत्र, कार्यालयीन पोचपावती, मूळ जातीचा दाखला घेऊन उपस्थित रहावे.
एस.एस.गुंजाळ, अध्यक्ष, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, धुळे
बातम्या आणखी आहेत...