आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षात पुष्य नक्षत्राचे २० याेग; साेन्याच्या खरेदीसाठी चांगले मुहूर्त, अमृतसिद्धीचेही १४ याेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यावर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत २० दिवस पुष्य नक्षत्र याेग असून, त्यात दाेन वेळा गुरुपुष्य तीन दिवस रविपुष्य याेगाचा समावेश अाहे. त्याचप्रमाणे डिसेंबरपर्यंत १४ दिवस अमृतसिद्धी याेगदेखील असणार अाहे.
पुष्य नक्षत्रात साेन्याच्या खरेदीला ग्राहकांकडून पसंती िदली जाते. यंदा माेठ्या प्रमाणात हा याेग अाल्याने साेने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढणार अाहे. पुष्य नक्षत्र अमृतसिद्धी याेग हे शुभकार्यासाठी फलदायी मानले जातात. उत्तम फळ मिळण्याचा हा याेग असताे. या याेगात जमीन, घर, वाहन अाणि दागिन्यांची खरेदी करणे समृद्धीचे लक्षण मानले जाते. तसेच गुरुवार अाणि रविवारी असणाऱ्या पुष्य याेगास ‘पुष्यामृत याेग’ असे म्हटले जाते. ही दाेन्ही नक्षत्रे सगळ्या नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ असतात. तसेच या दिवशी केलेले कार्यही शुभ फलदायी असल्याचे पंडित जयंत कुळकर्णी यांनी सांगितले.
हे अाहेत अमृतसिद्धी याेग
मे- सकाळी ते दुपारी १२.१५ वाजेपर्यंत
१५ मे- सूर्याेदयापासून ते दुपारी १.२५पर्यंत
१२ जून- सूर्याेदयापासून दुपारी १०.१४पर्यंत
१३ जुलै- दुपारी १.४६पासून रात्री १२.१५पर्यंत
१६ जुलै- दुपारी ते रात्री १२.१० पर्यंत
१० अाॅगस्ट- सूर्याेदयापासून रात्री ९.२५पर्यंत
१३ अाॅगस्ट- सूर्याेदयापासून रात्री ११.४२ पर्यंत
सप्टेंबर- सकाळी ६.१०पासून रात्री १२.३५पर्यंत
१० सप्टेंबर- सूर्याेदयापासून रात्री २.३०पर्यंत
अाॅक्टाेबर- सूर्याेदय ते रात्री १.१०पर्यंत
२७ अाॅक्टाेबर- सूर्याेदय ते रात्री १२.१६पर्यंत
नाेव्हेंबर- सकाळी ६.१२ ते रात्री ११.३०पर्यंत
२४ नाेव्हेंबर- सूर्याेदय ते रात्री ८.३०पर्यंत
डिसेंबर- सूर्याेदय ते दुपारी वाजेपर्यंत
रविपुष्यनक्षत्र- २९नाेव्हेंबर २७ डिसेंबर
गुरुपुष्यनक्षत्र- १६जुलै १३ सप्टेंबर

नक्षत्रांचा राजा पुष्य
ज्याेतिष्यअभ्यासकांच्या मते एकूण २७ नक्षत्रे असतात. त्यात पुष्य नक्षत्राला राजाचा दर्जा अाहे. गुरुवारी पुष्य नक्षत्रात साेन्याच्या दागिन्यांसह पिवळ्या रंगाची वस्तू खरेदी केल्यास विशेष फलदायी ठरते. त्याचप्रमाणे रविवारी पुष्य याेगात गृहप्रवेश करून भूमी वाहन खरेदी केले जाते.