आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू - पारोळा, मुसळीजवळ अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा/जळगाव - जळगाव जिल्ह्यात सोमवारी दोन अपघात झाले. पारोळ्याजवळ झालेल्या अपघातात दोन जण, तर मुसळी फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले. पारोळ्यातील अपघातानंतर मोटारसायकलचा स्फोटही झाला.
भवरखेडे (ता.धरणगाव) येथील महेश बापू पाटील (वय २८), गणेश लोटन पाटील (वय ३०), कैलास साहेबराव पाटील (वय २८) हे मोटारसायकलने (एम.एस.१९-४०१९) मुकटी येथे जाण्यासाठी निघाले होते. पारोळ्याजवळील हिरापूर फाट्याजवळ असताना दुपारी ३.३० वाजता बोलेरो (एमएच १५ टीआर ५५८३) ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्या वेळी मोटारसायकल बोलेरोच्या वरून जोरदार उडाली.
त्यानंतर स्पार्किंग होऊन तिचा स्फोट झाला. यात मोटारसायकल जाळून खाक झाली. महेश यास जोरदार मार लागल्याने तो जागीच ठार झाला. गणेश पाटील कैलास पाटील यांच्यावर पारोळा येथे प्रथमोपचार करून धुळे येथे हलविण्यात आले. परंतु रूग्णालयात नेत असतानाच गणेशचा मृत्यू झाला. कैलासवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मुसळी फाट्याजवळ मारुती अल्टो कंटेनरच्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी वाजेच्या सुमारास घडली. सचिन भालचंद्र भावसार (वय ३२) दिग्गेज ललित ठक्कर (३५, दोघे रा. एरंडोल) असे या ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. यात सचिन भावसार हा जागीच ठार झाला. तर दिग्गेज ठक्कर यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. अपघातानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्यास मालवाहू रिक्षेतून (एमएच१९ - बीएम १४४१) रुग्णालयात आणण्यात आले होते.