आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inaravhila Club Of The Accession Ceremony, Mews In Marathi

इनरव्हीलचा ‘प्रकाशाचा मार्ग’...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा सोमवारी मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये झाला. या वेळी नूतन अध्यक्षा नीलिमा रेदासनी यांनी पदभार स्वीकारला. या सोहळ्यास इनरव्हील असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.रश्मी शर्मा, संगीता घोडगावकर, सुजित परदेशी, ममता जैन, ममता कांकरिया, राजश्री पगारिया, अलका नेहते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळत्या अध्यक्षा दीप्ती अग्रवाल यांनी पदाची सूत्रे नूतन अध्यक्षा नीलिमा रेदासनी यांना, तर हेमा बियाणी यांनी सेक्रेटरीपदाची सूत्रे सुजाता मुणोत यांच्याकडे सोपवली. त्यानंतर इनरव्हीलच्या 11 सदस्यांना शपथ देण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष- हेमा बियाणी, आयपीपी- दीपाली अग्रवाल, खजिनदार- राजश्री पगारिया, आयएसओ- ममता जैन व मेडिकल कमिटीत डॉ.मनीषा दमाणी, फेलोशिप कमिटीत रंजन शाह, तर सल्लागार म्हणूून नूतन कक्कड, नीता जैन आदींची निवड झाली.