आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशातील सर्वात माेठे, सुसज्ज बंदिस्त नाट्यगृह आकारास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील सैनिक कल्याण हाॅलशेजारी तयार हाेत असलेल्या अाॅडिटाेरियम (बंदिस्त नाट्यगृह) च्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला अाहे. अाता दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी मार्चच्या बजेटमध्ये निधीची तरतूद हाेणार अाहे. या टप्प्यात अासनव्यवस्था, लायटिंग, अत्याधुनिक साउंड सिस्टिम तसेच वातानुकूलित यंत्रणेचे काम हाेणार अाहे. त्यामुळे हे बंदिस्त नाट्यगृह या वर्षात पूर्णत्वास येऊन जळगावकरांची सांस्कृतिक भूक भागवेल.
अशी आहे आसनव्यवस्था
१२०० जळगावयेथील बंदिस्त नाट्यगृहाची
१०३० नंदुरबारयेथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराची
९०० धुळे येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहाची
सांस्कृतिक चळवळीला चालना मिळेल

संपूर्ण वातानुकूलित नाट्यगृह
बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाला जून २०१३ मध्ये सुरुवात झाली अाहे. अंतर्गत सजावट इतर व्यवस्थेसह सुसज्ज झाल्यानंतर हे नाट्यगृह अासनव्यवस्था सुविधेत खान्देशातील सर्वात माेठे नाट्यगृह ठरणार अाहे. धुळे येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहाची अासनव्यवस्था ९०० तर नंदुरबारच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराची अासनव्यवस्था एक हजार ३० एवढी अाहे. मात्र, जळगावच्या नाट्यगृहाची अासनव्यवस्था तब्बल एक हजार २०० एवढी असणार अाहे. तसेच हेे संपूर्ण वातानुकूलित असणार अाहे. अाजच्या तारखेत अासनव्यवस्था सुविधेमुळे नंदुरबारचे नाट्यगृह हे खान्देशात पहिल्या क्रमांकाचे मानले जाते. त्याची जागा जळगावचे नाट्यगृह घेईल.

जळगाव शहरात असलेले बालगंधर्व खुले नाट्यगृह जिल्हा बँकेचे सभागृह हे दाेनच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध हाेतात. खुले नाट्यगृह हे अावाज सुविधांअभावी अनेकदा गैरसाेयीचे ठरते, तर जिल्हा बँक सभागृहाची देखरेख अासनव्यवस्थेची झालेली दुरवस्था, यामुळे प्रेक्षक नाखुश असतात. त्याचप्रमाणे येथील रंगमंचावर कला सादर करताना अनेक ज्येष्ठ कलावंतांनी जाहीर नाराजी व्यक्त केली अाहे. या पार्श्वभूमीवर तयार हाेत असलेले बंदिस्त नाट्यगृह जळगावच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देणारे ठरू शकेल.