आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीच्या दिवशीही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. त्याकरिता आयकर विभागाचे सेवा केंद्र शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने सर्व आयकर कार्यालयांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगावचे आयकर सेवा केंद्रही शनिवारी सुरू होते.

ऑडिट करीत नसलेल्या करदात्यांना पुढल्या शुक्रवारपर्यंत ऑनलाइन व आयकर कार्यालयात जाऊन विवरणपत्र भरायचे आहे. सध्या बहुतेक करदाते ऑनलाइन इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे. पाच लाखांच्या आतील उत्पन्न असलेल्या करदात्यांना ऑनलाइन अथवा मॅन्युअली रिटर्न भरता येणार आहे. पाच लाखांवरील करदात्यांना ऑनलाइन रिटर्न भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळेच सध्याचा आठवडा सीए, अकाउंटंट यांच्यासाठी खूप धावपळीचा आहे. जिल्ह्यात सुमारे 85 हजार करदाते आहेत, त्यापैकी केवळ 15 ते 20 हजार करदात्यांनी आतापर्यंत रिटर्न दाखल केले आहेत. उर्वरित बहुतांशी करदात्यांनी ऑनलाइन रिटर्न भरले आहेत.

31 मार्चअखेर त्यांना भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता करता येणार आहे. रिव्हाइसची संधी देखील करदात्यांना मिळणार आहे. आठवडाभरापासून रिटर्न फाइल करण्यासाठी व्यावसायिक आणि नोकरदारवर्गाची धावपळ सुरू आहे. त्यानुसार बँकांमध्येही पासबुक भरण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

रविवारीदेखील विवरणपत्र भरण्याची सुविधा प्राप्त
इन्कम टॅक्स भरण्यासाठी सुटीच्या दिवशी देखील आयकर सेवा केंद्रात विवरणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील कार्यालयीन वेळेत विवरणपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. आर.व्ही. निमजे, वरिष्ठ कर साहाय्यक, आयकर विभाग

आयकर विवरणपत्र भरलेल्या करदात्यांना 31 जुलैपर्यंत त्रुटींची पूर्तता करता येणार आहे. नोकरदार वर्गाकडून अडीच लाखांच्या आतील इन्कमटॅक्स भरण्याची सध्या धावपळ आहे. बर्‍याच करदात्यांचा ऑनलाइन इन्कम टॅक्स विवरणपत्र भरण्याकडे कल दिसून येत आहे. जयेश ललवाणी, अध्यक्ष, सीए असोसिएशन