आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर चुकवेगिरीच्या संशयामुळे आयकरची होलसेल व्यापाऱ्यावर धाड, 5 तासांहून अधिक काळ तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रिटर्न भरण्याची मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. धाडसत्र सुरू केले आहे. बुधवारी दाणा बाजारातील पोलनपेठेत मोहन ड्रायफ्रुट्सवर जळगाव आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकून पाच तास कसून तपासणी केली. दिवाळीच्या तोंडावर किराणा मालाच्या घाऊक दुकानावर धाड टाकल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. 
 
दिवाळी १५ दिवसांवर आली आहे. जळगावच्या बाजारपेठेत कोट्यवधींचा माल दाखल होत आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर आयकर विभागाची करडी नजर आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आयकर विभागाचे धाडसत्र सुरू झालेले आहे. बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव आयकर विभागाचे आठ अधिकारी एम.एच.१९ वाय ५५१५ या क्रमांकाच्या कारमध्ये दाणा बाजारात आले. सुभाष चौकात कार उभी करून पोलनपेठेतील एम.के.कृपलानी यांच्या मोहन ड्राय फ्रुट्सवर धाड टाकली. अधिकाऱ्यांनी या प्रतिष्ठाणबरोबर गोडाऊनचीही पाहणी केली. धाडीमुळे दुकान मालक कामगार सैरभैर झाले होते. कारवाई सुरू असताना अनेक ग्राहक दुकानात येत होते. दुकान मालकाने दोन कामगारांना समोर उभे केले होते. दुकान बंद असल्याचे ग्राहकांना सांगण्यात येत होते. मात्र, दुकान सुरू असल्यामुळे ग्राहकही अधिक चौकशी करीत होते. अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असल्याचे सांगितल्यानंतर ग्राहक परत जात होते. 
 
बिले,पैसे, उत्पादनेही तपासली 
अधिकाऱ्यांनीया दुकानातील खरेदी-विक्रीची बिले तपासली. दोन अधिकारी दुकानाच्या समोरच्या भागात, तर इतर सहा अधिकारी गोडाऊनमध्ये तपासणी करीत होते. त्यांनी दुकानामध्ये असलेली ड्रायफ्रुट्सच्या विविध उत्पादनांचीही तपासणी केली. गल्ल्यातील राेकडही मालकाला बाहेर काढायला लावली. दुकानातील कामगाराला त्याची मोजदाद करायला लावली. दुपारी ३.३० वाजता सुरू झालेली तपासणी सायंकाळी वाजताही सुरूच होती. कारवाईबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी कारवाई सुरू आहे. ती गोपनिय असल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 
बातम्या आणखी आहेत...