जळगाव - गेल्यातीन दिवसांपासून सतत घसरणारे तापमान बुधवारी अंशांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहर गारठले आहे. झोंबणाऱ्या थंडीचा परिणाम जनजीवनावर जाणवत आहे. नीचांकी तापमान, गेल्या आठवड्यातील अवकाळी पाऊस, ताशी ११ किमीच्या वेगाने वाहणारे वारे या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शहरातील गारठा अधिक झोंबणारा ठरत आहे.
दोन महिने उशिराने सुरू झालेल्या हिवाळा आता राज्यभर जाणवत आहे. गेल्या चार दिवसांत किमान तापमान १९ अंशांवरून अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी जळगाव जिल्ह्यात अंश तापमान होते. राज्यात नाशिक येथे सर्वाधिक कमी ६.६ अंश तापमान नोंदवले गेले. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा ४५ अंशात असून वेग ताशी ११ किलाेमीटर एवढा असल्याने थंडी अधिक झोंबणारी ठरत आहे. दिवसभर प्रभाव असलेल्या थंडीमुळे जळगावकरांची पहाट काहीशी उशिरा होऊन सायंकाळची लगबगही लवकर आटोपत असल्याचे गेल्या तीन दिवसांपासून निदर्शनास येत आहे. पहाटे वाजेपर्यंत आणि सायंकाळी वाजेपासून धुके पडत असल्याने रेल्वे, महामार्ग, इतर रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होत आहे.
प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांची वेळ सकाळी वाजेची असल्याने विद्यार्थ्यांना त्यापूर्वीच घरातून बाहेर पडावे लागते. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ६.३० वाजेलाच घरातून बाहेर पडावे लागते. पहाटेच्या प्रहरी थंडीचा गारठा अधिक असल्याने चिमुकल्यांना हुडहुडी भरत आहे. तापमानात आणखी घट झाल्यास प्राथमिक शाळांची वेळ बदलून दोन तास उशिराने करण्याची मागणी काही पालकांकडून होत आहे. शाळेची वेळ बदलण्यासंदर्भात काही पालक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत