आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increased Crime In The City; Work Other DB Resine

शहरातील गुन्हेगारी वाढली; काम करा अन्यथा डीबी साेडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पाेलिसठाण्याच्या हद्दीतील गुन्हे तपासाचे मुख्य काम शाेध पथकाचे (डीबी) असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढलेल्या गुन्ह्यांमुळे या पथकाकडे बाेट दाखवले जात अाहे. त्यामुळे डीबीतील कर्मचाऱ्यांनी काम करण्याची गरज अाहे. त्यांना काम करायचे नसेल तर बाजूला व्हावे, असा सूचना वजा इशारा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी दिला.
शहरातील सहा पाेलिस ठाण्यातील डीबी कर्मचाऱ्यांची गुरुवारी प्रेरणा सभागृहात बैठक झाली. या वेळी डाॅ. सुपेकर यांनी डीबी पथकाच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त केले. या वेळी अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, एलसीबीचे पाेलिस निरीक्षक प्रभाकर रायते अाणि सर्व पाेलिस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित हाेते.
अाेरिजनल पाेलिसिंग करा
डीबीतील कर्मचाऱ्यांनी शिक्षा भाेगून अालेले गुन्हेगार सध्या काय करीत अाहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे. काही दिवसांच्या अंतराने हिस्ट्रीशीटरला स्थानिक गुन्हे शाखेसमाेर उलटतपासणीसाठी अाणले पाहिजे. फक्त प्रभारी अधिकाऱ्यांच्या अाजूबाजूला फिरणाऱ्या डीबी पथकाची गरज नाही. अाेरिजनल पाेलिसिंग करा, काही अडचण अाली तर थेट मला फाेन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

कामाचा दरराेज अाढावा घेणार
शहरातीलगुन्हेगारांसंदर्भात कर्मचाऱ्यांनी दरराेज काय कामकाज केले, त्याचा अाढावा उपविभागीय पाेलिस अधिकारी आठ दिवसांत, अपर पाेलिस अधीक्षक १५ दिवसांत अािण मी महिन्यात घेणार अाहे. तसेच पाेलिस ठाण्याच्या बाहेर बेकायदा जमाव करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. - डाॅ.जालिंदरसुपेकर, जिल्हापाेलिस अधीक्षक
बैठकीत एलसीबीने दिली गुन्हेगारांची यादी
शहरातगेल्या वर्षभरात घरफाेड्या, जबरी चाेऱ्या, साेनसाखळी चाेऱ्या, दंगल या गुन्ह्यातील सर्व अाराेपींची यादी तयार करून त्या त्या पाेलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे देण्यात अाली. तसेच पाेलिस ठाण्यांच्या पातळीवर गुन्हे दत्तक याेजना राबवण्याच्या सूचनाही दिल्या. यात पाेलिस ठाण्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या हद्दीतील १० गुन्हेगारांसंदर्भात माहिती ठेवण्यास सांगितले अाहे.

प्रभारी अधिकाऱ्यांची जबाबदारी
कर्मचाऱ्यांकडूनकाम करून घेण्याची जबाबदारी पाेलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची अाहे. त्यामुळे त्यांनीच ठरवायचे अाहे. काेणाला या पथकात ठेवायचे, काेणाला नाही. पाेलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचे काम केवळ गुन्हे दाखल करण्याचे नाही. तर गुन्हे शाेधही त्यांनीच घ्यायचा अाहे. केवळ स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हे उघड करण्याचा ठेका घेतलेला नाही. त्यामुळे या पुढे गुन्हे घडल्यानंतर संबंधित प्रभारी अधिकाऱ्यालाही जबाबदार धरण्यात येईल.
गुन्ह्यांची अाकडेवारी
वर्षदराेडे जबरी चाेरी
२०१० ३९ ६१
२०११ २१ ८०
२०१२ ४० ८१
२०१३ ३८ ११९
२०१४ ४९ १२८
२०१५ जूनपर्यंत १९ ४८
बैठकीला उपस्थित गुन्हे शाेध पथकातील पाेलिस अधिकारी कर्मचारी.
बैठकीत बाेलताना डाॅ.सुपेकर. शेजारी नंदकुमार ठाकूर, माेक्षदा पाटील.
जणांची चाैकशी
शहरातीलसहा पाेलिस ठाण्यातील हिस्ट्रीशीटर्सला गुरुवारीही चाैकशीसाठी पाेलिस अधीक्षक कार्यालयात बाेलावले हाेते. जणांची चाैकशी पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी केली.