आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये वाढणाऱ्या गुंडगिरीमुळे नागरिकांचा उडताे थरकाप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या तीन वर्षांत नागपूरमध्ये गुंडगिरी प्रचंड वाढली अाहे. त्यात मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या भागात तर गुंडगिरीमुळे नागरिकांचा थरकाप उडत अाहे, असा आरोप नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी राहणारे तथा राष्ट्रवादी अाेबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी शुक्रवारी जळगावात केला. तसेच दारूबंदी असलेल्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरपाेच अाॅनलाइन दारू विक्री करीत असल्याचा अाराेपदेखील त्यांनी या वेळी केला. 


राष्ट्रवादीने अाेबीसी संघटन वाढवण्यासाठी राज्यभरात १९ डिसेंबर ते १४ एप्रिलदरम्यान ‘अाेबीसी जनजागृती अभियान’चे अायाेजन केले अाहे. यासंदर्भात तयारी करण्यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी शुक्रवारी जळगावात मेळावा घेतला. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, अापण नागपूरमध्ये रेशीम बागेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराशेजारी राहतो. सध्या या परिसरातील, मतदारसंघातील शांतता भंग पावली अाहे. तेथील गुन्हेगारी वाढली अाहे. त्यांच्या घराच्या परिसरात खुनाच्या घटना घडल्या अाहेत, असे ते म्हणाले. बैठकीला अाेबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय घुगे, अॅड.सचिन अावटे, प्रभारी दिलीप पवार, प्रदेश सरचिटणीस सविता बाेरसे,अक्षय चाैधरी, राजू महाजन, शहर अध्यक्ष नंदू पाटील, डाॅ. सुषमा चाैधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. तसेच कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या अाेबीसी विराेधी धाेरणावर हल्ला चढवला. दरम्यान, राज्यभर ओबीसी जनजागृती अभियान राबविणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. 


पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील, माजी अामदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, अरुण पाटील, दिलीप साेनवणे, जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, अाेबीसी सेलच्या महिला पदाधिकारी सविता बाेरसे, महानगर अध्यक्षा नीला चाैधरी, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, साेपान पाटील, मंगला पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कांॅग्रेसचे पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 


७/१२ला७/१२ काेरा करण्यासाठी अांदाेलन
येत्या ७-१२-२०१७ राेजी शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा काेरा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी किसान सेलतर्फे जेलभराे अांदाेलन करण्यात येणार अाहे, अशी माहिती किसान सेलचे जिल्हाध्यक्ष साेपान पाटील यांनी या वेळी दिली. 


अाेबीसींची शिष्यवृत्ती बंद 
शासनानेअाेबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. स्पर्धा परीक्षा पास झालेल्या १६०० विद्यार्थ्यांना क्रिमीलेअरच्या अटीमुळे नोकरीला मुकावे लागले. अाेबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव अाहे. सत्ता अाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगरांना अारक्षण देण्याचे अाश्वासन दिले हाेते, ते अजूनही पूर्ण केले नाही. अाेबीसींची संख्या माेठी अाहे; परंतु सरकार जातीनिहाय जनगणना जाहीर करीत नसल्यामुळे ही संख्या कळत नाही. मागासवर्गीय महामंडळावर अाेबीसी अध्यक्ष असावा, शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सरकारने निधी द्यावा, स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारसी लागू कराव्या, अादी मागण्या बाळबुधे यांनी केल्या. 

बातम्या आणखी आहेत...