आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंतर्गत कलह: स्वतंत्र विदर्भासाठी आज रिपाइंचे ‘गटबाजी आंदोलन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी रिपाइंतर्फे (आठवले गट) दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार आहेत. रिपाइं जिल्हा व महानगरतर्फे रेल रोको, तर रिपाइंच्या युवक आघाडीतर्फे रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको करण्यात येईल. सारख्या मागणीसाठी एकाच परिसरात एकाच पक्षातर्फे दोन आंदोलन होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने रिपाइं नेत्यांमधील गटबाजी पुन्हा एकादा चव्हाट्यावर येणार काय, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

रिपाइंचे महागराध्यक्ष गजानन कांबळे यांनी रेल्वे पोलिस बलाला 5 ऑगस्ट रोजी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी 12.30 वाजेच्या सुमारास अकोला-पूर्णा पॅसेंजर गाडी अडवण्यात येणार आहे. दरम्यान, रिपाइंच्या युवक आघाडीतर्फे सोमवारी रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे पत्र पश्चिम विदर्भाचे मुख्य संघटक अशोक नागदेवे यांनी रामदासपेठ पोलिसांना दिले आहे. या आंदोलनात अशोक नागदेवे, कार्याध्यक्ष सुनील अवचार, गोपाल कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

विदर्भामध्ये पक्षाचा विस्तार झपाट्याने होत आहे. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी विविधांगी आंदोलने करण्यात येत आहे. यामध्ये गटबाजीचा प्रश्नच नाही.
-अशोक नागदिवे, मुख्य संघटक, पश्चिम विदर्भ रिपाइं.

सोमवारी रिपाइं जिल्हा व महानगरातर्फे रेल रोको करण्यात येणार आहे. या पूर्वीही विविध मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पक्षात कुठेही गटबाजी नाही.
-डी. गोपनारायण, जिल्हाध्यक्ष रिपाइं.

तगडा बंदोबस्त..
रिपाइंतर्फे रेल रोको करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिस बलाने रामदासपेठ पोलिस ठाण्याला कळवले. त्यानुसार बंदोबस्तासाठी 4 अधिकारी आणि 40 कर्मचार्‍यांचे नियोजन केले आहे. वेळेवर बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात येणार आहे.