आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत विकास परिषदेतर्फे २९ रोजी ‘हम करे राष्ट्र आराधन’ महानाट्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रारंभाची वाटचाल उलगडणारे महानाट्य ‘हम करे राष्ट्र आराधन’ हे जळगाव शहरात २९ जानेवारीला सादर होणार आहे. या महानाट्याचे आयोजन भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेने केले आहे. 
 
रा.स्व.सं. ची शिस्त, विचारधारा आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी समाजातील विविध घटकांना नेहमी उत्सुकता असते. विविध सामाजिक घटकांसाठी समाजोपयोगी प्रकल्प सुरू असतात. देशाशी संबंधित अनेक विषयांवरची भूमिका सुस्पष्ट राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी असते. 

संघाची सविस्तर ओळख करून घेण्याची संधी जळगावकर आणि जिल्हावासीयांना उपलब्ध होत आहे. महानाट्यात संघाच्या स्थापनेपासून (सन १९२५) तर सन १९७३ पर्यंतच्या काळातील प्रवासाची माहिती देण्यात आली आहे.
 
संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१ एप्रिल १८८९ ते २१ जून १९४०) आणि द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी (सन १९४० ते १९७३) यांच्या काळातील संघाची वाटचाल, विस्तार, कार्याचे वर्णन करण्यात आले आहे.

भावी पिढीने शिक्षणानंतर रोजगार, उद्योग व्यापार अथवा व्यवसाय करीत राष्ट्र निर्माण कार्यातही सहभाग द्यावा, वेळ द्यावा, या हेतूने या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. 
 
३५ कलावंतांचा सहभाग 
हेमहानाट्य नागपूर येथील महालक्ष्मी प्रॉडक्शन या संस्थेने निर्मित केले आहे. यात ३५ कलावंतांचा सहभाग आहे. हे महानाट्य हिंदी भाषेत आहे. हे महानाट्य शनिवारी सायंकाळी वाजता ए. टी. झांबरे विद्यालयाच्या प्रांगणात सादर होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...