आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आढळले ‘इंडियन एग इटर’साप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निसर्गचक्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली ‘इंडियन एग इटर’ (अंडी खाणारा साप) या प्रजातीचे दोन साप शहरातील एमआयडीसी व वाघनगर परिसरात आढळून आले आहेत. सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी त्यांना जीवदान दिले. मात्र, प्रशासनाने या संदर्भात नोंद न घेताच साप जंगलात सोडून देण्याचे आदेश दिले.

जागतिक पातळीवर वन्यजीवांचा अभ्यास करून त्यांच्या नोंदी ठेवणारी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) या सापाला 1969 मध्ये रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. जगभरात केवळ भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या तीनच देशात सापाची ही प्रजात आढळून येते. अत्यंत दुर्मीळ असलेल्या या प्रजातीचे जतन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना नसल्यामुळे नेपाळ, बांग्लादेशसह भारतातूनही ‘इंडियन एग इटर’ नामशेष जाहीर केले होते.

हे आहे वर्णन
महाराष्ट्र, गुजरात राज्यात आढळतो
शरीरावर चमकदार तपकिरी ठिपके, डोक्यापासून ते शेपटीपर्यंत पिवळसर पांढर्‍या रंगाची रेषा, पूर्णपणे विकसित सापाची लांबी 31 इंच, निमविषारी, शांत स्वभावाचा असतो, झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यातील अंडी हे खाद्य


नोंदी पाठवाव्या
प्रशासनाने या सापांच्या नोंदींचा अहवाल शासनाकडे पाठवला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी प्रय} केले जातील. वासुदेव वाढे, सर्पमित्र

तत्काळ सोडला
‘इंडियन एग इटर’ सापांचा पंचनामा करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. प्रजात दुर्मीळ असल्यामुळे तत्काळ सोडण्याचे आदेश होते. बी.एस.पाटील, वनपाल

2004 ला अमरावतीत आढळला
‘इंडियन एग इटर’ सर्प 1996 मध्ये नामशेष झाल्याचे जाहीर झाल्यानंतर 2004 ला अमरावती येथे आढळून आला. तेथील प्रशासनाने तशी नोंद घेऊन ‘आययुसीएन’ला ही माहिती पाठवली. त्यामुळे अमरावतीची नवी ओळख जागतिक पातळीवर झाली.

जळगावात चार वेळा आढळला
‘इंडियन एग इटर’ साप जळगावात चार वेळा आढळून आला आहे. 2008 ला भुसावळ येथे सर्पमित्र सतीश कांबळे आणि अँलेक्स प्रेसडी, 2010 मध्ये सर्पमित्र प्रकाश ढाके यांनी शहरातील महाबळ परिसरात तर 2013 मध्ये एकदा शिवकॉलनी अणि रविवारी वाघनगर तसेच एमआयडीसी परिसरात या सापाचे वास्तव्य आढळून आले आहे.