आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Post News In Marathi, Letter Box, Jalgaon, Divya Marathi

तीन रंगांच्या टपालपेट्यांचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन रंगाचे कुतूहल
जळगाव मुख्य कार्यालयाबाहेरील तीन टपालपेट्यांची दुरुस्ती करण्यात आली असून त्यांना निळा, हिरवा आणि लाल असे रंग दिले आहेत. पूर्वी हे रंगपेट्यांच्या वरच्या बाजूला लावलेल्या पाट्यांना देण्यात आले होते व बाकी पूर्ण पेटीला लाल रंग होता. पाट्यावर रंगाचे काय महत्त्व आहे याचा उल्लेख पेटीवर होता; पण सध्या रंगविलेल्या पेट्यांवर ती कोणत्या टपालासाठी आहे. याचा उल्लेख कुठेही नसल्याने अनेकांचा गोंधळ होत असून अनेक जण बुचकळ्यात पडतात.

काय आहे रंगाचा अर्थ
निळा : ही टपाल पेटी शहरातील स्थानिक टपालासाठी आहे.
हिरवा : ही टपाल पेटी जळगाव जिल्ह्यातील टपालासाठी आहे.
लाल : ही टपाल पेटी रंगाप्रमाणे जलद म्हणजे इतर जिल्ह्यासाठी आहे.


या वेळेवर निघते टपाल
मुख्य कार्यालयातील टपाल पेटीतील टपाल हे दिवसातून तीन वेळा काढून ते रवाना केले जाते. पूर्वी टपाल केव्हा काढले जाते याची वेळ टपालपेटीवर होती; पण सध्या ती टपालपेटीवर कुठेही दिसत नाही. टपाल सकाळी 10 वाजता, दुपारी 3.30 वाजता, दुपारी 5.30 वाजता काढले जाते.


48 टपालपेट्या शहरात
03 वेळा काढले जाते टपाल
03 रंग असतात पेट्यांना


सर्व पेट्यांची दुरुस्ती
डाक विभागाने शहरातील मोडकळीस आलेल्या टपालपेट्यांची दुरुस्ती अन् रंगरंगोटीचे काम सध्या हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत शहरात विविध भागात बसवण्यात आलेल्या तब्बल 48 पेट्या दुरुस्त करण्यात येणार आहेत. तसेच कुलूप नसलेल्या पेट्यांना कुलूप लावले जाणार आहे.


का सुरू केले काम?
तुटक्या पेट्यांमुळे टपाल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे डाक विभागाच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. ही समस्या सोडविण्यासाठी अन् नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पेट्यांची दुरूस्ती केली जात आहे असे सहायक पोस्ट अधीक्षक एम.एस.जगदाळे यांनी सांगितले.