आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Post Service News In Marathi, Post Man, Letter, Divya Marathi, Jalgaon

पत्र पाठवताय, तर पोस्टमनची सेवा फक्त तिसर्‍या मजल्यापर्यंतच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केंद्रीय डाक विभागाने पोस्टमन तिसर्‍या मजल्यापर्यंतच डाक पोहोचवण्याबाबतचा निर्णय नुकताच घेतला आहे. या नव्या आदेशाचे पालन करत शहरातील पोस्टमनांनी तिसर्‍या मजल्यापेक्षा उंच इमारतीत, अपार्टमेंटमध्ये टपाल पोहोचवण्याचे काम थांबवले आहे. जागा मालकांनी पोस्टाच्या पेट्यांची सुविधा केली नसेल तर खालीच खिडक्यांमध्ये टपाल टाकण्याचा मार्ग पोस्टमनांनी निवडला आहे. सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर पोस्टपेट्या लावण्याचेही पोस्टमनांनकडून सांगितले जात आहे.


शहरातील अपार्टमेंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपार्टमेंट तसेच सात ते आठ मजल्यांपर्यंत रहिवास वाढला आहे. येथील रहिवास असलेल्या नागरिकांना टपाल पोहोचवण्यासाठी पोस्टमनांना लिफ्ट अथवा जिन्याने चढून वर जावे लागते. यासह विविध संस्था, संघटनांची कार्यालये देखील उंच इमारतीत असल्याने टपाल, कुरिअर पोहोचवणेही पोस्टमनांना कठीण जात होते. त्यामुळे जमा झालेल्या टपाल वितरणास विलंब लागत असल्याने अनेकांचे महत्त्वाचे टपाल मिळण्यास विलंबही होत होता.


याबाबत पोस्टमनांनकडूनही तक्रारी वाढत होत्या. याची केंद्रीय डाक विभागाने दखल घेत तिसर्‍या मजल्यापर्यंतच डाक पोहोचवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील पोस्टमनांनकडून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयाबाबत बहुतांश नागरिकांना कल्पना नसल्याने पोस्टाच्या पेट्यांअभावी टपाल खिडक्यांमध्ये टाकून आपले कर्तव्य पोस्टमन बजावत आहेत.


पुढे वाचा .....