आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railways Track After British Only Ten Thousand KM

ब्रिटीशांनंतर रेल्वेमार्गात फक्त 10 हजार किमीची वाढ! रेल्वेमार्ग जाळे विस्तारण्याचा प्रयत्न हवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भारतावरील ब्रिटीश सत्तेचा अस्त झाला तेव्हा 53 हजार किलोमीटरचा रेल्वेमार्ग होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या सहा दशकात फक्त 10 हजार 327 किलोमीटरच्या नवीन रेल्वेमार्गाची भर पडली आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारला 9 जुलै रोजी रेल्वे बजेट सादर करण्याची संधी मिळाली आहे. हे सरकार नवीन रेल्वेमार्ग वाढवण्याचा विचार या बजेटमध्ये करेल, अशी अपेक्षा आहे.
युएसएची वॅगन्स संख्या दुप्पट
भारतात माहवाहतुकीच्या वॅगन्सची संख्या 2 लाख 7 हजार 779 तर युएसएची वॅगन्स संख्या 4 लाख 75 हजार 416 आहे. भारतीय रेल्वेची प्रवासी डब्यांची संख्या 43 हजार 124 तर अमेरिकेत हीच संख्या फक्त 1 हजार 186 आहे. रशियातील प्रवासी बोगींची संख्या 33 हजार 955 तर वॅगन्स 5 लाख 66 हजार 802 आहेत. ही आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली तर रशियात मालवाहतुकीसाठी सर्वाधिक वापर रेल्वेमार्गाचा होत असल्याचे स्पष्ट होते.
ऑस्ट्रेलियाचा रेल्वेमार्ग तोकडा
ऑस्ट्रेलियात रेल्वेमार्गाचे जाळे फक्त 9 हजार 639 किलोमीटर आहे. 13 हजार कर्मचारी रेल्वेत सेवारत आहेत. प्रवासी बोगींची संख्या 663 असून 10 हजार 889 वॅगन्स मालवाहतुकीसाठी वापरल्या जातात. या देशात रेल्वेची 509 इंजिन आहेत. भारतात 8 हजार 110 तर रशियात 12 हजार 63 रेल्वेचे इंजिन आहेत. जगात सर्वात जास्त इंजिन निर्मितीला रशियात प्राधान्य दिले जात असल्याचे ही आकडेवारी सांगते.

​असा खर्च होतो रुपया
10 पैसे वीज व डिझेलवर
28 पैसे दुरुस्ती, नवीन मार्ग व विकास
62 पैसे कर्मचारी वेतन

पुढील स्लाइडमध्ये, रेल्वेची जागितक स्तरावरील तुलना