धुळे/ चाळीसगाव- धुळे तालुक्यातील बोरविहीर येथील रहिवासी असलेला लष्करी जवान चंदू बाबूराव चव्हाण (वय 22) हा नजर चुकीने नियंत्रण रेषा (एलओसी) ओेलांडून पाकमध्ये गेला आहे. पाकिस्तानी लष्कराने त्याला ताब्यात घेतले आहे. चंंदुला परत आणा, असे चंंदुच्या कुटुंंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे.
दुसरीकडेे, हे वृत्त कळताच त्याच्या गावात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदू सुखरुप घरी यावा, यासाठी आता गावकरी प्रार्थना करु लागले आहेत.
चंदू बोरविहीर येथील पी.रा. पाटील शाळेचा माजी विद्यार्थी अाहे. अभ्यासात हुशार तेवढाच जिद्दी असलेल्या चंदूचे लहानपणापासून सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने तयारी करून 2012 मध्ये चंदू सैन्यात दाखल झाला. तो 181 आर्मर रेजिमेंट 37 राष्ट्रीय रायफल गटात कार्यरत आहेत.
आजोबांशी झाले अखेरचे बोलणे
दरम्यान 19 सप्टेंबरला चंदूने आजोबा चिंधा पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून शेवटचा संपर्क साधला होता. त्यात सुटी मिळाल्यास 30 सप्टेंबरपर्यंत घरी येईल, असेदेखील त्याने सांगितले होते. तसेच मोठा भाऊ भूषण यांच्याशी उरी हल्ल्यानंतर शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर मात्र परिवाराच्या अन्य सदस्यांशी कोणतेच बोलणे झाले नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, चंदूच्या अाजीवर अंत्यसंस्कार....भाऊही सैन्यात...लहानपणी झाले पोरके...बोरविहीरचे तब्बल 100 तरुण देशसेवेत ....